Suhas Kande Vs Sameer Bhujbal Rada: 'तुझा मर्डर फिक्स', सुहास कांदे यांची समीर भुजबळ यांच्या कार्यकर्त्यास थेट धमकी

यावेळी दोन्ही गटात मोठा राडा झाला. त्यातून निर्माण झालेल्या संघर्षावेळी ''आज तुझा मर्डर फिक्स आहे'', असे उद्गार सुहास कांदे यांनी काढले.

Suhas Kande | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Elections 2024) आज (20 नोव्हेंबर) मतदान पार पडत आहे. मतदानादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांचे उमेदवार यांच्यात आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. असाच संघर्ष नांदगावर विधानसभा (Nandgaon Assembly Constituency) मतदारसंघात पाहायला मिळाला.ते भुजबळ यांनाच उद्देशून बोलल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, या प्रकाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

''आज तुझा मर्डर फिक्स''

नाशिक येथील नांदगाव मतदारसंघात घडलेल्या या प्रकाराची जोरदार चर्चा आहे. सांगितले जात आहे की, सुहास कांदे यांनी काही मतदारांना बोलावले होते. त्यावर समीर भुजबळ यांनी जोरदार आक्षेप घेतला. मतदार घेऊन जाणारी बस आडवली. या वेळी कांदे यांनीही तेथे प्रवेश केला. दोन्ही उमेदवार आमनेसामने आल्याने मोठा राडा झाला. दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आक्रमक झाले. ज्यामुळे पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. याच वेळी कांदे यांनी समीर बुजबळ यांना ''आज तुझा मर्डर फिक्स आहे'' अशी थेट धमकी दिली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर दोन्ही उमेदवार बाजूला झाले आणि प्रकरण निवळले. मात्र, घडल्या प्रकारामुळे नांदगाव परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. (हेही वाचा, Amit Thackeray-Sada Sarvankar at Siddhi Vinayak: सदा सरवणकर-अमित ठाकरे सिद्धिविनायक मंदिरात आले समोरासमोर; 'उलटा धनुष्यबाण' बघून अमित ठाकरे यांनी केलेल्या कृतीची चर्चा (Watch Video))

विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान

महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या 288 जागांसाठी पर पडत असलेल्या निवडणुकीत आज मतदान होत आहे. अनेक मतदारसंघांमध्ये दिग्गज उमेदवार मैदानात आहेत. त्यामुळे काट्याची टक्कर आहे. अशा वेळी काही मतदारसंघांमध्ये जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळत आहे. खास करुन बारामती येथे अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत आहे. या ठिकाणी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून दमदाटी केल्याचा आरोप शरद पवार गाटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. दुसऱ्या बाजूला कर्जत जामखेड येथेही अशाच काहीशा प्रकाराची माहिती आहे. अब्दुल सत्तार निवडणूक लढवत असलेल्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघातही दोन गटात राडा झाल्याचे समजते. (हेही वाचा, Supriya Sule on Bitcoin Scam: बिटकॉईन खरेदी विक्री प्रकरण; सुप्रिया सुळे यांचे विरोधकांना आव्हान; शरद पवार यांच्याकडून पाठराखण; Ajit Pawar म्हणाले आवाज परिचयाचा)

दरम्यान, आज होणाऱ्या मतदानाची मतमोजणी येत्या 23 नोव्हेंबरला पार पडणार आहे. त्यामुळे मतदार राजा कोणाला कौल देतो याबाबत थेट शनिवारीच माहिती मिळणार आहे. मतदानची प्रक्रिया राज्यभरात सुरळीत पार पडत असून मतदारही मोठ्या उत्सुकतेने मतदानाचा हक्क बजावत आहेत.