Yavatmal News: नागपूरकडे जाणारी एसटी बस पेटवली, घटनेत प्रवाशी सुरक्षित

यवतमाळमध्ये नागपूर तुळजापूर महामार्गावर १० ते १२ अज्ञातांनी एसटी बस पेटवल्याची घटना घडली आहे.

ST Bus | (Photo Credits: MSRTC)

Yavatmal News: यवतमाळमध्ये नागपूर तुळजापूर महामार्गावर १० ते १२ अज्ञातांनी एसटी बस पेटवल्याची घटना घडली आहे. बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. बसमध्ये ७२ प्रवासी होते. हा प्रकार का घडला या घटनेअंतर्गत पोलिस तपासणी करत आहे. विदर्भ- मराठवाडा सीमेवर उमरखेडजवळील पैनगंगा नदी पुलावर हा प्रकार घडला. या घटनेची माहिती पोलिसांना देताच घटनास्थळी दाखल झाले. ही बस हातगाववरून नागपूरकडे जात होती.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील हातगाव तालुक्यातील मार्लेगांव जवळ ही घटना घडली. काही अज्ञात लोकांनी एसटी बस थांबवून पेटवून दिल्याची माहिती समोर आली. आग लागताच प्रवाशी बसमधून बाहेर आले. प्रवाशी तात्काळ बाहेर आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. सर्व प्रवाशी सुरक्षित आहे. या घटनेत बस सपुर्ण जळून खाक झाली आहे. नांदेडच्या हातगाव आगाराची ही बस नागपूरच्या दिशेने जात होती.

या मागे मराठी आरक्षणाच्या आंदोलकांचा हाथ असवा अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. कारण विदर्भाच्या सीमेवर असलेल्या हदगाव तालुक्यात मराठा आरक्षण आंदोलन आधीपासून आधीपासूनच मोठ्या प्रमाणात सुरु आहे, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आग लावण्याऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. गावागावत मराठा आरक्षणाता मुद्दा पेटला आहे. आंदोलक मनोज जरांगेना पाठिंबा देण्यासाठी गावागावत साखळी उपोषण केल जात आहे. याच पार्श्वभुमीवर राजकिय नेत्यांना गावात बंदी घालण्यात आली आहे. गावाकऱ्यांनी अश्यातच एका नेत्याची गाडी फोडली.