Y Category Security To Shiv Sena MP: शिवसेनेच्या 12 खासदारांना Y श्रेणी सुरक्षा; लोकसभा अध्यक्षांना लिहीलेल्या पत्रानंतर कारवाई
या पत्रावर लोकसभा अध्यक्षांनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. मात्र, हे पक्ष लिहिणाऱ्या 12 खासदारांना मात्र काल रात्रीपासून वाय श्रेणीची सुरक्षा (Y category security) देण्यात आली आहे.
शिवसेना (Shiv Sena) आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड केल्यानंतर आता खासदारही त्या मार्गावर आहेत. शिवसेना खासदारांनी एक गट स्थापन केला आहे. या गटाला अध्याप कोणत्याही प्रकारे मान्यता नाही. मात्र, या गटाने लोकसभा अध्यक्षांना एक पत्र (Letter) सोमवारी (18 जुलै) लिहीले होते. या पत्रात त्यांनी राहुल शेवाळे यांना शिवसेना गटनेता म्हणून मान्यता द्यावी याबाबत विनंती केली होती. शिवसेनेच्या 12 खासदारांनी हे पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांना देण्यात आले होत. या पत्रावर लोकसभा अध्यक्षांनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. मात्र, हे पक्ष लिहिणाऱ्या 12 खासदारांना मात्र काल रात्रीपासून वाय श्रेणीची सुरक्षा (Y category security) देण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आगोदरच्या मुख्य प्रतोद भावना गवळी यांना हटवून त्या जागी खासदार राजन विचारे यांना मुख्य प्रतोद करावे असे पक्ष दिले होते. यावर लोकसभेच्या सभापतींनी कोणत्याही प्रकारे निर्णय घेतला नाही. मात्र, शिवसेनेच्या या 12 खासदारांचे म्हणने असे की, भावना गवळी याच चीफ व्हीप आहेत. दरम्यान, शिवसेनेचे अधिकृत चिन्ह असलेल्या धनुष्य बाणावर दावा सांगण्याचा बंडखोर आमदार आणि खासदारांच्या गटाचा विचार आहे. मात्र, सभापतींच्या निर्णयानंतरच त्यावर पुढचे पाऊल उचलले जाईल. (हेही वाचा, Ramdas Kadam On Shiv Sena: एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाचवली, उद्धव ठाकरे यांनी दोन पावले मागे यावे- रामदास कदम)
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे अर्ज दाखल करत म्हटले आहे की खासदार विनायक राऊत यांची संसदीय पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या खासदारांनी पक्षाच्या भूमिकेपासून फारकत घेतली आहे त्यापैकी कोणत्याही खासदाराच्या गटाचा प्रतिनिधीत्वाचा विचार करु नये. कोणताही कारवाई करण्यापूस्वी आमची भूमिका समजून घ्यावी.शिवसेनेचे संसदीय नेते संजय राऊत यांनी लोकसभेच्या सभापतींना हे पत्र सादर केले आहे. या पत्रत राजन विचारे यांना मुख्य प्रतोद केल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.