जागतिक आरोग्य संघटनेकडून धारावीकरांच्या संयमाची दखल - वर्षा गायकवाड
त्यामुळे साडेतीन महिने माझ्यासोबत दिवसरात्र काम करणाऱ्या सर्व डॉक्टर, भारतीय जैन संघटना, सर्व कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि सर्व धारावीकरांचे मनापासून अभिनंदन, अशा शब्दांत शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
धारावीकरांच्या संयमाची जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दखल घेतली आहे. त्यामुळे साडेतीन महिने माझ्यासोबत दिवसरात्र काम करणाऱ्या सर्व डॉक्टर, भारतीय जैन संघटना, सर्व कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि सर्व धारावीकरांचे मनापासून अभिनंदन, अशा शब्दांत शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेकडून धारावीची कोरोना विरुध्दच्या लढ्यातील रोल मॉडेल म्हणून दखल घेण्यात आली. यावर प्रतिक्रिया देताना वर्षा गायकवाड बोलत होत्या. यावेळी वर्षा गायकवाड म्हणाल्या की, साडेतीन महिने माझ्या सोबत दिवसरात्र काम करणारे, रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी तयार केलेल्या ॲम्बुलन्सचे खाजगी वाहन चालक, स्थानिक डॉक्टर असोसिएशन यांनी माझ्या आवाहनाला प्रतिसाद देऊन तपासणीस सहकार्य केले. भारतीय जैन संघटनेने मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन व डिजिटल एक्स रे मशीन उपलब्ध करुन दिली. त्यामुळे सर्व डॉक्टर, भारतीय जैन संघटना, सर्व कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि सर्व धारावीकरांचे मनापासून अभिनंदन! (हेही वाचा - Coronavirus Cases In Mumbai: मुंबईमध्ये आज 1308 नवे कोरोना बाधित रुग्ण, तर 39 जणांचा मृत्यू)
धारावीमध्ये सर्व कोरोना योद्ध्यांनी संयमाने आणि धैर्याने कोरोना विषाणूचा सामना केला. अनेक अडचणींचा सामना करत असतानादेखील आपलं मनोधैर्य खचू दिलं नाही. त्यामध्ये सर्व प्रशासनाचे विशेष सहकार्य लाभले, असंही वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितलं.
नागरिकांचे सहकार्य, स्वयंसेवी संस्थांचा सक्रिय सहभाग व महापालिका प्रशासनाने केलेल्या सूक्ष्म नियोजनामुळे धारावी सारख्या दाटीवाटीच्या क्षेत्रात कोरोना संसर्ग रोखण्याच्या प्रयत्नाला आलेल्या यशाची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली, अशा शब्दांत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.