Mumbai: विक्रोळीमध्ये 3 दुचाकीस्वरांकडून महिलेचा भररस्त्यात छळ; पीडितेने व्हिडिओ शेअर करत केली आरोपीवर कारवाईची मागणी, Watch

पीडितेने तिच्या सोशल मीडियावर जाऊन तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. तसेच घडलेल्या प्रकाराचा व्हिडिओ बनवून आरोपींना शिक्षा व्हावी, अशी मागणी या महिलेने केली आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

Mumbai: विक्रोळीमध्ये 3 दुचाकीस्वरांकडून महिलेचा भररस्त्यात छळ; पीडितेने व्हिडिओ शेअर करत केली आरोपीवर कारवाईची मागणी, Watch
Woman harassed by 3 bikers in Vikhroli (PC Twitter)

Mumbai: मुंबईतील विक्रोळी (Vikhroli) उपनगरात एका महिलेचा तीन दुचाकिस्वरांनी छळ केला. ही घटना रात्री विक्रोळी पार्क साईटजवळ घडली असून त्या वेळी ती तिच्या पतीसोबत होती. त्यानंतर दोघांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. ही घटना 16 जुलै रोजी घडली असून 27 जुलैपर्यंत कोणतीही कारवाई झाली नसल्याचे महिलेने सांगितले.

पीडितेने तिच्या सोशल मीडियावर जाऊन तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. तसेच घडलेल्या प्रकाराचा व्हिडिओ बनवून आरोपींना शिक्षा व्हावी, अशी मागणी या महिलेने केली आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. (हेही वाचा -Heart Transplant: 39 वर्षीय भारतीय लष्करातील जवानासाठी एयर फोर्सच्या विमानाचा नागपूर-पुणे प्रवास; हृदय प्रत्यारोपण यशस्वी)

या जोडप्याने सुरुवातीला त्यांच्या राहत्या घराजवळील विक्रोळी पार्क साइट पोलिस स्टेशनला संपर्क साधला होता. परंतु, तेथील अधिकार्‍यांनी त्यांना टिळक नगर पोलिस ठाण्यात जाण्यास सांगितले आणि घटनेचे कार्यक्षेत्र तेथेच असल्याचा दावा केला.

(The above story first appeared on LatestLY on Jul 27, 2023 12:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).