Nagpur Shocker: घटस्फोटित महिला प्रियकरासोबत फिरत असल्याबद्दल भावाने शिवीगाळ केली, काही तासांतच महिला घरात लटकलेल्या अवस्थेत आढळली

भावाने पाहिल्यानंतर महिलेला शिवीगाळ केली.

Suicide | (Photo Credits: unsplash.com)

Nagpur Shocker:  महाराष्ट्रातील नागपूर (Nagpur) शहरात एका 22 वर्षीय महिलेला तिच्या घरात लटकलेल्या (Suicide) अवस्थेत सापडल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली. घटस्फोटित महिलेने तिच्या प्रियकरासोबत फिरताना तिच्या भावाने पाहिल्याने आणि त्याने प्रियकरासोबत फिरल्याचे म्हणून खूप शिवीगाळ केली. या कारणांहून तिने आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पंख्याला स्कार्फ बांधून गळफास घेतल्याचे समोर येत आहे. पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.

एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, शुक्रवारी शताब्दी स्क्वेअर परिसरात या महिलेला एका पुरुषासोबत तिच्या भावाने पाहिले, महिलेला भावाने फटकारले. परंतु तो माणूस पळून गेला, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.“त्याच दिवशी ही महिला तिच्या घरात पंख्याला स्कार्फ बांधलेल्या अवस्थेत सापडली. तिचा भाऊ आणि आईने सांगितले की जेव्हा ही घटना घडली तेव्हा ते कामावर होते,” अधिकाऱ्याने सांगितले. कामावरून परतल्यानंतर त्यांनी तिला लटकलेले दिसले आणि तिला तातडीने रुग्णालयात नेले जेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले, असेही त्यांनी सांगितले.

पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून या प्रकरणाचा विविध अंगांनी तपास सुरू आहे. नागपुर पोलीसांनी संशयित व्यक्तींसोबत चौकशी सुरु केली आहे. महिलेचा आधी लग्न झाले होते आणि काही वर्षांनी नवऱ्यासोबत घटस्फोट झाल्याचे पोलीसांनी सांगितले आहे, घटस्फोटा संबधित कोणतेही वृत्त उघडकी आले नाही. पोलीस कंबर कसून चौकशी करत आहे.