ST Bus Accident: पसरणी घाटात बसचा अचानक ब्रेक फेल झाला, अपघातात एका महिलेचा मृत्यू

या अपघातात महिलेचा मृत्यू झाला आहे.

Accident (PC - File Photo)

ST Bus Accident:  बस अपघाताची मालिका सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यात दोन मोठं अपघात घडून आले. पुण्यातून महाबळेश्वरला जात असताना आणखी एका बसचा अपघात घडून आला. या अपघातात 20 ते 25 प्रवाशी बस मध्ये होते. दरम्यान दुचाकी वर बसलेल्यापैकी एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अशी माहिती समोर आली आहे.  बसचा अपघात झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घाट परिसरात ब्रेक फेल झाल्याने एसटी बस रस्त्याखाली गेली आहे. त्यामुळे अपघात घडून आला आहे. बुवा साहेब मंदिराजवळ हा अपघात  घडून आला आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पसरणी घाटात बसचा अचानक ब्रेक फेल झाला. बस मध्ये 20 ते 25 प्रवाशी प्रवास करत होते. ही एस टी बस पुण्याहून महाबळेश्वरच्या दिशेला निघालेली होती. दरम्यान अचानक पसरणी घाटात ब्रेक फेल झाला आणि अपघात घडून आला. बसच्या मागून येणारी दुचाकी वर बसलेले ३ जण होते. दोघ जण या बसच्या खाली आले दरम्यान दोघांचा दुर्दैवी मृत्यू टळला.  आणि दुचाकी वर बसलेल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रवाशांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

या बसमध्ये 20 ते 25 जण प्रवास करत होते त्यांना कोणत्याही प्रकारची गंभीर जखम झाली नाही. या अपघाताचा पोलिसांकडून पंचनामा झाला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. बस चालकाने बस नियंत्रित करण्याचा प्रयत्न चालू होता परंतू दुचाकावरील महिलेचा अपघातात प्राण गेला. प्रिती बोधे  असं या मृत व्यक्तीचे नाव आहे.