मुंबई: विक्रोळी येथील टँकर अपघातात फुटपाथवर झोपलेल्या दोन महिलांचा मृत्यू; एक जखमी
रस्त्यावर झोपलेल्या तीन जणांना टँकरने चिरडल्याची घटना मुंबईतील विक्रोळी येथून समोर आली आहे.
रस्त्यावर झोपलेल्या तीन जणांना टँकरने चिरडल्याची घटना मुंबईतील (Mumbai) विक्रोळी (Vikhroli) येथून समोर आली आहे. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला असून एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे. हे तिघजण कैलास कॉम्प्लेक्स टिम्बकटु हॉटेलजवळील फुटपाथवर झोपले होते. लक्ष्मी वाघमारे, सायमा वाघमारे अशी मृत महिलांची नावे आहेत. तर कार्तिक वाघमारे हा जखमी झालेला चिमुरडा अवघ्या 3 वर्षांचा आहे. (रस्त्यावर अपघात झाल्यानंतर मदत करण्याऐवजी व्हिडिओ काढल्यास बघ्यांवर होणार कारवाई)
ANI ट्विट:
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टँकर पार्क करताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि तो टँकर दुसऱ्या टँकरला धडकला. या घटनेत रस्त्यावर झोपलेले तिघंजण टँकरखाली चिरडले गेले. यात दोन महिलांचा मृत्यू झाला असून जखमी मुलावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement