मुंबई: विक्रोळी येथील टँकर अपघातात फुटपाथवर झोपलेल्या दोन महिलांचा मृत्यू; एक जखमी

रस्त्यावर झोपलेल्या तीन जणांना टँकरने चिरडल्याची घटना मुंबईतील विक्रोळी येथून समोर आली आहे.

मुंबई: विक्रोळी येथील टँकर अपघातात फुटपाथवर झोपलेल्या दोन महिलांचा मृत्यू; एक जखमी
Mumbai Tanker Accident (Photo Credits: ANI)

रस्त्यावर झोपलेल्या तीन जणांना टँकरने चिरडल्याची घटना मुंबईतील (Mumbai) विक्रोळी (Vikhroli) येथून समोर आली आहे. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला असून एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे. हे तिघजण कैलास कॉम्प्लेक्स टिम्बकटु हॉटेलजवळील फुटपाथवर झोपले होते. लक्ष्मी वाघमारे, सायमा वाघमारे अशी मृत महिलांची नावे आहेत. तर कार्तिक वाघमारे हा जखमी झालेला चिमुरडा अवघ्या 3 वर्षांचा आहे. (रस्त्यावर अपघात झाल्यानंतर मदत करण्याऐवजी व्हिडिओ काढल्यास बघ्यांवर होणार कारवाई)

ANI ट्विट:

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टँकर पार्क करताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि तो टँकर दुसऱ्या टँकरला धडकला. या घटनेत रस्त्यावर झोपलेले तिघंजण टँकरखाली चिरडले गेले. यात दोन महिलांचा मृत्यू झाला असून जखमी मुलावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Jun 09, 2019 08:35 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).