पंढरपूर: विठ्ठल-रखुमाईला उबदार कपड्यांचा साज; सोशल मीडीयावर व्हायरल झाले विलोभनीय रूप
विठ्ठल रूक्मिणीला हा पोषाख वसंत पंचमी ठेवला जातो. ही प्रथा मागील काही वर्षांपासून जोपासली जात आहे.
महाराष्ट्रात आता हळूहळू थंडीची चाहूल लागायला सुरूवात झाली आहे. सामान्यांप्रमाणेच आता देवही गारठू लागल्याने त्यांना उबदार कपडे घातले जात आहेत. पंढरपूरच्या श्री विठ्ठल आणि रूक्मिणी यांनादेखील स्वेटर घालण्यात आलं आहे. कार्तिकी वारीनंतर प्रक्षाळपूजेनंतर दुसर्या दिवशी विठ्ठल-रूक्मिणीला रजई, शाल, मफलर घातले आहे. विठ्ठल रूक्मिणीला हा पोषाख वसंत पंचमी ठेवला जातो. ही प्रथा मागील काही वर्षांपासून जोपासली जात आहे. सारसबागेतील गणेशमूर्तीला पुण्याच्या थंडीचा कडाका, सोशल मीडियावर स्वेटर- टोपी घातलेल्या गणेशमुर्तीचा फोटो व्हायरल.
पंढरपूरला सकाळी देवाची काकड आरती झाल्यानंतर कानपट्टी बांधली जाते. तसेच रजई घातली जाते. रूक्मिणीला शाल घातली जाते. यामागे देवाला थंडी वाहू नये ही भावना असते. त्यानंतर उबदार पोषाखांवरच पारंपारिक दागिने घातले जातात. जसं हिवाळ्यात थंडीपासून रक्षण केलं जातं तसेच उन्हाळ्यात देवाला पांढरे कपडे घातले जातात. मुंंबई मध्येही थंडीची चाहुल; नोव्हेंबर महिन्यातील किमान तापमान 21.4
पहा विठ्ठल - रखुमाईचं विलोभनीय रूप
विठोबा आणि रखुमाई याच्या दर्शनासाठी कार्तिकी आणि आषाढी एकादशी दिवशी वारकरी मोठ्या संख्येने विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी पंढरपूरात येतात.