Uddhav Thackeray On Ram Temple Consecration Ceremony: अयोध्येतील रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्यात उद्धव ठाकरे सहभागी होणार का? म्हणाले, 'मला आमंत्रण मिळाले नाही, वाटलं तर जाईल'

जेव्हा जेव्हा मला वाटेल तेव्हा मी अयोध्येला राम मंदिराच्या दर्शनासाठी जाईन.'

Uddhav Thackeray On Ram Temple Consecration Ceremony: अयोध्येत रामाचे भव्य मंदिर तयार होणार आहे. 22 जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन (Ram Temple Consecration Ceremony) होणार असून राम लल्ला (Ram Lalla) चा अभिषेक करण्यात येणार आहे. या दिवशी देशभरातील अनेक दिग्गज अयोध्येला पोहोचणार आहेत. रामललाच्या प्रतिमेला पीएम मोदींच्या (PM Modi) हस्ते अभिषेक करण्यात येणार आहे. दरम्यान, अयोध्येत आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामही पूर्ण झाले असून त्याला महर्षी वाल्मिकी यांचे नाव देण्यात आले आहे. तसेच अयोध्येत सुरू असलेली विकासकामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. तथापी, रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेला येणाच्या निमंत्रणावरून राजकारणही तीव्र झाले आहे. राम लल्लाच्या अभिषेकासाठी अयोध्येला जाण्याबाबत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पुन्हा एकदा वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेला जाण्यासंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'मला अद्याप कोणतेही निमंत्रण आलेले नाही आणि मला तिथे जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नाही. जेव्हा जेव्हा मला वाटेल तेव्हा मी अयोध्येला राम मंदिराच्या दर्शनासाठी जाईन. मी मुख्यमंत्री असतानाही रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. मी प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी 22 जानेवारीलाच अयोध्येला पोहोचले पाहिजे असे नाही. मात्र या क्षणी मी म्हणतो की, राम मंदिरावर राजकारण नको. राम मंदिर भाजप किंवा मोदी सरकारने बांधले नसून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बांधले जात आहे.' (हेही वाचा - PM Narendra Modi Inaugurated Maharishi Valmiki International Airport: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले अयोध्येतील महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन, Watch Video)

तथापी, यावेळी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबतही विधान केले. यासंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, एमव्हीएमध्ये सर्व काही सुरळीत सुरू आहे, भारत आघाडीची बैठक झाली तेव्हा आम्ही एकत्र निर्णय घेऊ, असे ठरले होते. कोणालाही वाटेल ते म्हणू द्या. काँग्रेसचे इतर नेते बोलतात तेव्हा मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, मग ते महाराष्ट्रातील असो की दिल्लीतील, मला काही सांगितल्याशिवाय मी यावर काहीही बोलणार नाही. (हेही वाचा - PM Narendra Modi To Visit Ayodhya Today: पंतप्रधन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत विमानतळ, नवीन रेल्वेगाड्यांचे आज उद्घाटन; जाणून घ्या संपूर्ण तपशील)

जागावाटपाचा कोणताही फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. प्रकाश आंबेडकर यांचे स्वतःचे सूत्र आहे. त्याच्याशी आमची चर्चा जवळपास अंतिम झाली आहे. काही दिवसांत संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकर बसून पुढील गोष्टी ठरवतील, असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.