Maharashtra: देशमुख ईडीसमोर चौकशीसाठी हजर का राहत नाहीत? 'अशी' माहिती आली समोर

मात्र, मात्र देशमुख एकाही चौकशीला हजर झाले नाहीत.

Anil Deshmukh | (Photo Credits- Twitter)

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी (ईडीने Enforcement Directorate) राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना पाचव्यांदा समन्स बजावले आहे. मात्र, मात्र देशमुख एकाही चौकशीला हजर झाले नाहीत. दरम्यान, अनिल देशमुख चौकशीसाठी ईडीसमोर हजर झाले नाहीत. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख चौकशीसाठी का हजर होत नाहीत आणि कधी होणार? याविषयी अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर स्वत: अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तसेच ईडी कार्यालयात हजर न राहण्यामागचे कारणही त्यांनी सांगितले आहे.

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने नुकतेच अनिल देशमुख यांना पाचव्यांदा समन्स बजावले असून त्यांना 18 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, पाचव्यांदाही अनिल देशमुख ईडीच्या कार्यलयात हजर झाले नाहीत. यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, “माझी ईडीच्या बाबतीतली याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्विकृत केली आहे. सर्वोच्च न्यायालय ही याचिका लवकरच ऐकून घेणार आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने मला खालच्या न्यायालयामध्ये जाण्याची मुभा सुद्धा दिली आहे. त्यामुळे आता ही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मी स्वतः ईडीच्या समोर जाणार आहे व त्यांना सहकार्य करणार आहे". हे देखील वाचा- Asha Buchke Joins BJP: शिवसैनिक आशा बुचके यांचा भाजपमध्ये प्रवेश

अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला दरमहा 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, असा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. याप्रकरणी हायकोर्टाच्या आदेशाने सीबीआय आणि ईडी यांच्याकडून चौकशी सुरू आहे. ईडीने आत्तापर्यंत या कारवाईमध्ये अनिल देशमुख यांचे हॉटेल, कॉलेज, घर अशा सर्वच ठिकाणी छापेमारी केली आहे.