Mumbai Shocker: कुंकू झालं वैरी! दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीची हत्या; आरोपी पतीला अटक, गोरेगाव येथील घटना
दारूला पैसे न दिल्याने तो पत्नीशी नेहमी वाद घालत असे. गुरुवारी, त्याच मुद्द्यावर त्याने तिच्याशी भांडण केले आणि तिला मारहाण केली.
Mumbai Shocker: मुंबईतील (Mumbai) गोरेगाव पूर्व (Goregaon East) येथे एका व्यक्तीने दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पत्नीची हत्या (Murder) केली. 42 वर्षीय आरोपीला रेल्वे पोलिसांनी मालाड भागातील मालवणी येथून अटक केली. घटनेनंतर आरोपी शहरातून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. गुरुवारी संध्याकाळी, परवीन अन्सारी (26) तिच्या घरात गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली. तिला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
मृत महिलेच्या पतीचं नाव मोईनुद्दीन अन्सारी असं असून तो पत्नीची हत्या करून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. दारूला पैसे न दिल्याने तो पत्नीशी नेहमी वाद घालत असे. गुरुवारी, त्याच मुद्द्यावर त्याने तिच्याशी भांडण केले आणि तिला मारहाण केली. अनासरी महानगरातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना बोरिवली रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. (हेही वाचा -Fetus Of Baby Girl Found In Plastic Bag: लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या आवारात कचऱ्यात प्लास्टिकच्या पिशवीत सापडला मुलीचा गर्भ; तपास सुरू)
माचिसची काडी न दिल्याने चौकीदारी हत्या -
दुसर्या प्रकरणात, शुक्रवारी पहाटे नवी मुंबईतील सानपाडा येथे एका 22 वर्षीय व्यक्तीने माचिसची काडी देण्यास नकार दिल्याने एका चौकीदाराची कथितपणे हत्या करण्यात आली होती. मोहम्मद आदिल अजमअली शेख असं या आरोपीचं नाव असून तो तुर्भे नाका येथील रहिवासी आहे. शेख हे बेलापूर रोडवरील रिक्षा स्टँडजवळून जात असताना त्यांनी 53 वर्षीय पीडित प्रसाद भानुसिंग खडका यांच्याकडे माचिसची काडी मागितली, मात्र त्यांनी ती दिली नाही. यामुळे शेख संतापला. त्याने मोठा दगड चौकीदाराच्या डोक्यात घातला. ही घटना सकाळी 1.45 च्या सुमारास घडली. (हेही वाचा - Navi Mumbai Crime News: नेरळमध्ये भिकाऱ्याचा विद्यार्थ्यींवर जीवघेणा हल्ला, आरोपीला अटक)
या घटनेत पीडित व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आणि त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) कलम 302 (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.