Maharashtra Assembly Election Results 2024 On ABP News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार? 'येथे' पहा निकालाचे Live Streaming
मात्र, राज्याच्या निवडणूक आयोगाने (Election Commission) जाहीर केलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर (Maharashtra Assembly Election Results 2024) संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. राज्यातील सत्ता कोणाच्या हातात जाणार? याचा अंतिम निर्णय उद्याच्या मतमोजणीनंतर होणार आहे.
Maharashtra Assembly Election Results 2024 On ABP News: महाराष्ट्रातील 288 सदस्यीय विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचे भविष्य उद्या म्हणजेच 23 नोव्हेंबरला समजणार आहे. उद्या होणाऱ्या मतमोजणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. एक्झिट पोल (Exit Polls) ने भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीच्या विजयाचा अंदाज वर्तवला आहे. मात्र, राज्याच्या निवडणूक आयोगाने (Election Commission) जाहीर केलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर (Maharashtra Assembly Election Results 2024) संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. राज्यातील सत्ता कोणाच्या हातात जाणार? याचा अंतिम निर्णय उद्याच्या मतमोजणीनंतर होणार आहे.
राज्यात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात 288 विधानसभा मतदारसंघात मतदान झाले. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 58.22% मतदानाची नोंद झाली. गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक 63 टक्के मतदान झाले, तर मुंबई शहरात सर्वात कमी 49.07 टक्के मतदान झाले. (हेही वाचा -Maharashtra Election Results 2024: मतमोजणीच्या दिवशी मुंबई पोलिसांनी जारी केले निर्बंध; केंद्राच्या 300 मीटर परिघात लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी)
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 निकाल कधी आणि कुठे पाहायचा?
नवीनतम आणि सर्वसमावेशक परिणाम-संबंधित अपडेटसाठी तुम्ही ABP मराठी चॅनेलच्या संपर्कात राहू शकता. येथे तुम्हाला मतमोजणीसंदर्भातील लाईव्ह अपडेट्स मिळतील.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकेल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. जयंतराव पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल देसाई यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर आम्हाला विश्वास आहे की, आम्ही 160 जागा सहज जिंकू. एक्झिट पोलवर आमचा विश्वास नाही, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.