Antilia Bomb Scare: API Sachin Waze यांच्या निलंबनानंतर मुंबई पोलिस आयुक्तांवरील दबाव वाढला; Param Bir Singh यांची उचलबांगडी झाल्यास कोण होऊ शकत Mumbai Police Commissioner?
विरोधी पक्षाकडून सतत होणार्या हल्ल्यांना रोखण्यासाठी आता Mumbai Police Commissioner Param Bir Singh यांची उचलबांगडी होऊ शकते अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांपासून मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील Antilia घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडणं यामुळे बरीच चर्चा सुरू आहे. सध्या Antilia Bomb Scare केसचा तपास एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणेकडे आहे. या दोन्ही प्रकरणांवरून विरोधक राज्यामध्ये महाविकास आघाडी वर हल्लाबोल करत आहेत. यामध्येच API Sachin Waze यांचं पुन्हा निलंबन झाल्याने आता मुंबईचे पोलिस आयुक्त देखील टीकेचे धनी झाले आहेत. विरोधी पक्षाकडून सतत होणार्या हल्ल्यांना रोखण्यासाठी आता Mumbai Police Commissioner Param Bir Singh यांची उचलबांगडी होऊ शकते अशी चर्चा आता सुरू झाली आहे. दरम्यान Param Bir Singh यांना पदावरून हटवल्यास त्यांच्याजागी मुंबई पोलिस आयुक्त म्हणून कोणाची वर्णी लागणार? याची उत्सुकता देखील निर्माण झाली आहे.
आज महाविकास आघाडी सरकार मधील प्रमुख पक्ष शिवसेना, कॉंग्रेस आणि एनसीपी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीत बिघाड नाही सोबतच मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, Antilia Bomb Scare प्रकरणी तपास यंत्रणांच्या कामाअंती जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई होईल असे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे. अद्याप सरकारमध्ये खांदेपालट होणार नसल्याचं महाविकास आघाडी मधील नेते म्हणत असले तरीही मुंबई पोलिस आयुक्तांच्या उचलबांगडीची चर्चा सुरू आहे. Sanjay Raut यांचा केंद्रावर पुन्हा हल्लाबोल; महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणा पाठवून महाविकास आघाडी सरकार आणि Mumbai Police यांच्यावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न.
Param Bir Singh नंतर कोण होऊ शकतं मुंबई पोलिस आयुक्त ?
परमबीर सिंह यांना मुंबई पोलिस आयुक्त पदावरून हटवल्यास त्यांच्याजागी सेवा ज्येष्ठतेनुसार संजय पांडे यांची वर्णी लागू शकते. संजय पांडे हे 1986 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. तर संजय पांडे यांच्यासोबतच 1988 बॅचचे रजनीश शेठ, पुणे पोलिस आयुक्तपदाच्या कारभार सांभाळलेल्या रश्मी शुक्ला, ठाणे शहर पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर, 1990 बॅचचे अधिकारी सदानंद दाते अशी मोठी नावं शर्यतीमध्ये आहेत.
दरम्यान मुंबई पोलीस आयुक्तपद हे मानाचं आणि मोठ्या जबाबदारीचे आहे. मुंबई पोलिसांची ख्याती देशा-परदेशामध्ये आहे. त्यामुळे या पोलिसदलाच्या नेतृत्त्वाला निवडताना देखील प्रशासन, सरकार यांची कसोटी लागते. मागील काही दिवसांत सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातही मुंबई पोलिस खात्याला डागाळण्याचा प्रयत्न झाला. आता मनसुख हिरेन आणि Antilia Bomb Scare मध्ये मुंबई पोलिसांना बाजूला ठेवत केंद्रीय तपास यंत्रणांकडे त्याची जबाबदारी दिल्याने मुंबई पोलिसंच्या क्षमतेवर एकप्रकारे प्रश्नचिन्ह उठवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)