Who is Rahool Kanal? जाणून घ्या कोण आहेत राहूल कनाल, ज्यांना कुणाल कामरा स्टुडिओ तोडफोड प्रकरणी पोलिसांनी घेतले ताब्यात

कुणाल कामराचा एकनाथ शिंदे यांच्यावरील टिप्पणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, रविवारी रात्रीच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खारमधील हॅबिटॅट कॉमेडी क्लबची तोडफोड करण्यास सुरुवात केली. या संदर्भात शिवसेना युवा सेना (शिंदे गट) सरचिटणीस राहुल कनाल आणि इतर 11 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Who is Rahool Kanal? जाणून घ्या कोण आहेत राहूल कनाल, ज्यांना कुणाल कामरा स्टुडिओ तोडफोड प्रकरणी पोलिसांनी घेतले ताब्यात
Rahool Kanal

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर विनोदी कलाकार कुणाल कामरा (Kunal Kamra) अडचणीत आला आहे. शिवसेनेचे शिंदे गट) आमदार मुरजी पटेल यांच्या तक्रारीनंतर कुणालविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आता विनोदी कलाकारावर अटकेची तलवार टांगत आहे. अशात, शिवसेना युवा सेनेचे सरचिटणीस राहुल कनाल (Rahool Kanal) यांनीही कुणाल कामराला धमकी दिली आहे. ‘हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून येणे बाकी आहे’, असे त्यांनी म्हटले आहे.

कुणाल कामराचा एकनाथ शिंदे यांच्यावरील टिप्पणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, रविवारी रात्रीच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खारमधील हॅबिटॅट कॉमेडी क्लबची तोडफोड करण्यास सुरुवात केली. या संदर्भात शिवसेना युवा सेना (शिंदे गट) सरचिटणीस राहुल कनाल आणि इतर 11 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पण यानंतरही राहुल कनाल यांनी म्हटले आहे की, आम्ही मागे हटणार नाही. कामराला शिवसेना शैलीत चांगला धडा मिळेल.

राहुल कनाल यांचे स्वतःचे रेस्टॉरंट आहे आणि ते स्वतःचा व्यवसाय चालवतात. राहुल कनाल हे बॉलिवूड जगातही प्रसिद्ध आहेत. सलमान खानपासून ते क्रिकेटर विराट कोहलीपर्यंत, अनेकांचे राहुल कनालसोबतचे फोटो सोशल मीडियावर आहेत. राहुल हे वांद्रे येथील भाईजान रेस्टॉरंटचे मालक आहेत. याचे नाव त्यांनी सलमान खानच्या नावावर ठेवले आहे. राहुल कनाल हे आय लव्ह मुंबई ही एनजीओ देखील चालवतात. ते श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचे विश्वस्त देखील होते. राहुल कनाल यांचे शिवसेनेशी (यूबीटी) संबंध युवा सेनेपासून सुरू झाले. राहुल कनाल गेल्या 10 वर्षांपासून आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवा सेनेत होते. (हेही वाचा: Devendra Fadnavis On Kunal Kamra: 'कुणाल कामरा यांनी माफी मागावी'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील 'देशद्रोही' टिप्पणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया)

2023 मध्ये राहुल कनाल आणि इतर अनेक सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यावेळी त्यांना युवा सेनेचे सरचिटणीस हे पद देण्यात आले होते. पुढे राहुल कनाल यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सोशल मीडिया मोहिमेचे राज्य प्रमुख म्हणून नियुक्त केले होते. दरम्यान, स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या गाण्यावरून शिवसेना आक्रमक झाली आहे. कामराच्या मुंबई स्टुडिओची तसेच युनिकॉन्टिनेन्टल हॉटेलमध्ये जाऊन शिवसेनेने तोडफोड केली आहे. या तोडफोड प्रकरणी खार पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना सरचिटणीस राहुल कनाल आणि वांद्रे विभागप्रमुख कुणाल सरमळकर यांना पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement