कोण आहे मोहित कंबोज भारतीय? बाबा सिद्दीक हत्या प्रकरणात नाव; Zeeshan Siddique यांच्या दाव्याने खळबळ

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा करताना, झीशान सिद्दीकी यांनी म्हटले आहे की, या प्रकरणाचा बांद्रा झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाशी संबंध आहे. या प्रकरणात मोहीत कंबोज भारतीय आणि अनिल परब यांचाही समावेश आहे.

Zeeshan Siddique,Mohit Kamboj Bharatiya, Baba Siddique | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Who is Mohit Kamboj Bharatiya: माजी आमदार बाबा सिद्दीकी हत्या (Baba Siddique Murder Case) प्रकरणात त्यांचा मुलगा आणि माजी आमदार झीशान सिद्दीकी यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. झीशान यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात दावा केला आहे की, आपल्या वडिलांच्या हत्या प्रकरणात वांद्रे झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प (Bandra Slum Redevelopment) कळीचा मुद्दा ठरला. ज्यामुळे आपल्या वडिलांची हत्या झाली. याच वेळी त्यांनी आपल्या जबाबात सत्ताधारी भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे मोहित कंबोज भारतीय (Mohit Kamboj Bharatiya) यांचे नाव घेतले आहे. त्याचवेळी त्यांनी शिवसेना (UBT) आमदार अनिल परब (Anil Parab) यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे. या प्रकरणात आतापर्यंतचा हा सर्वात मोठा गौप्यस्फोट मानला जात आहे. या वादात नाव आलेले कोण आहेत मोहित कंबोज भारतीय? घ्या जाणून.

वांद्रे झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प वादाच्या केंद्रस्थानी

झीशान सिद्दिकी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात वांद्रे येथील संत ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पावर प्रकाश टाकला आणि दावा केला की त्यांचे वडील बाबा सिद्दीकी झोपडपट्टीवासीयांच्या हक्कांसाठी लढत होते. ज्यामुळे त्यांचा रिअल इस्टेट डेव्हलपर्सशी संघर्ष झाला आणि खोट्या खटल्यांद्वारे त्यांच्यावर पोलिसांचा दबाव आला. (हेही वाचा, Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांकडून चार्जशीट दाखल; सलमान खान शी जवळीक असल्याने लक्ष्य केल्याची माहिती)

झीशान सिद्दीकी यांनी जबाबात केलेले दावे

  • वडील बाबा सिद्दीकी यांनी त्यांच्या खासगी डायरीत 12 ऑक्टोबर 2024 रोजी मोहित कंबोज यांचे नाव लिहीले
  • वडिलांच्या हत्येच्या काही तास आधी सायंकाळी 5.30 ते 6.00 च्या दरम्यान बाबा सिद्दीकी आणि मोहित कंबोज यांचे व्हॉट्सअॅपवर बोलणे झाले.
  • झोपडपट्टी प्रकल्पात सहभागी असलेल्या व्यवसायिकांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर दबाव आणला. तसेच, विकासकांनी बाबा यांच्याब्दल अपमानास्पद भाषा वापरली.

अनमोल बिश्नोईच्या टोळीचा उल्लेख नाही

मुंबई पोलिसांनी दावा केला आहे की ही हत्या अनमोल बिश्नोईच्या टोळीने घडवून आणली होती, परंतु झीशानच्या विधानात टोळीचा उल्लेख नाही. या तफावतीमुळे तपासाच्या फोकस आणि गुन्ह्यामागील खऱ्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. झिशान सिद्दीकी यांच्या जबाबाबाबत फ्री प्रेस जर्नलने वृत्त दिले आहे. (हेही वाचा, Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणामध्ये 26 आरोपींवर मुंबई पोलिसांनी लावला 'मोक्का' .)

कोण आहेत मोहित कंबोज?

मोहीत कंबोज हे भारतीय जनता पक्षाचे पदाधीकारी आणि पक्षाचे पडद्यामागील सूत्रधार असल्याचे सांगितले जाते. ते विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणूनही ओळखले जातात. मुळचे उत्तर प्रदेशातील असलेले कंबोज 2004 मध्ये मुंबई येथे आले. सन 2005 मध्ये त्यांनी केबीजे ज्वेलर्स नावाची फर्म सुरु केली. त्यांचे वडील बनवारीलाल कंबोज हे रत्न आणि दागिन्यांचे व्यवसायिक होते. वडिलांकडूनच त्यांनी व्यवसायाशी संबंधीत काम शिकले. दरम्यान, ते 2012 ते 2019 या काळात इंडियन बुलियन अँड ज्वेलरी असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष देखील राहिले आहेत.

मोहीत कंबोज भारतीय यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. काहीच वर्षांपूर्वी मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हाही दाखल केला होता. त्या वेळी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रेयत कंबोज यांनी हे प्रकरण 'बऱ्याच काळापासून प्रलंबित' असल्याचे म्हणत आरोप फेटाळून लावला होता.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now