Hemant Nagrale: मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्त झालेले हेमंत नगराळे कोण आहेत? घ्या जाणून

त्यांच्या जागेवर राज्यातील एक वरीष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Hemant Nagrale (Photo Credit: ANI)

सचिन वाझे प्रकरणात (Sachin Vaze) आरोपांचा रोख वळलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांची अखेर या पदावरून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर राज्यातील एक वरीष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तपद हे डीजी दर्जाचे आहे. त्याच दर्जाचा अधिकारी या पदावर असावा म्हणून नगराळे यांच्याकडे हे पद सोपवण्यात आले आहे. नगराळे यांना सेवेबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक मिळाले आहे. तसेच विशेष सेवा पदक आणि आंतरिक सुरक्षा पदकानेही सन्मानित करण्यात आले आहे.

परमवीर सिंग यांना मुंबई पोलिस आयुक्तपदावरून काढून टाकण्याची जबाबदारी आता हेमंत नगराळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. यासह परमवीर सिंग यांना होमगार्ड विभागात पाठविण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. हे देखील वाचा- Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University: वेळापत्रक जाहीर, पण परीक्षा कुठल्या अ‍ॅपवरून होणार? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विद्यार्थी प्रचंड संभ्रमात

आयपीएस अधिकारी झाल्यानंतर नगराळे यांची पहिली नियुक्ती चंद्रपूरच्या राजुरा येथे नक्षली भागात झाली होती. 1989 ते 92 दरम्यान त्यांनी या ठिकाणी एएसपी म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर सोलापूरचे डीसीपी म्हणून नियुक्ती झाली आहे. 1992 मध्ये बाबरी मशीद कोसळल्यानंतर त्यांनी सोलापूरमधील कायदा आणि सुव्यवस्था उत्तम प्रकारे सांभाळली होती.

हेमंत नगराळे हे 2008 मध्ये मंबई झालेल्या दहशती हल्ल्यावेली एमएसईडीसीएलचे स्पेशल इन्स्पेक्टर जनरल होते. हल्ल्यावेळी नगराळे हॉटेल ताजमध्ये शिरले आणि त्यांनी जखमी आणि मृतांना बाहेर काढण्याची जबाबदारी पार पाडली, अशी माहिती फायनान्शियल एक्स्प्रेसने दिली होती. एवढेच नव्हेतर, त्यांनी ताजमध्ये ठेवण्यात आलेली आरडीएस्कने भरलेली बॅग बाहेर काढून सुरक्षित स्थळी ठेवली. तसेच बॉम्ब स्क्वॉडला पाचारण केले होते.

याआधी नगराळे यांनी 2014 मध्ये काही काळासाठी मुंबई पोलीस आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार संभाळला होता. याशिवाय, मुंबई पोलिसातही त्यांनी काही महत्वाच्या पदांचा कार्यभार संभाळला होता. नगराळे हे 2016 ते 2018 मध्ये कालावधी मुंबईचे पोलीस आयुक्त राहिले आहेत.

नुकतीच 2016 ते 2018 या कालावधीमध्ये ते नवी मुंबईचे पोलीस आयुक्त देखील राहिले आहेत. हेमंत नगराळे यांची नुकतीच 7 जानेवारी 2021 रोजी महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालकपदी बदली करण्यात आली होती.

हेमंत नगराळे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त असताना देशभर गाजलेल्या वाशीतील बँक ऑफ बडोदा दरोड्याची उकल अवघ्या दोन दिवसात केल्याने त्यांचे कौतुक झाले होते.