Mumbai Drug Case: कोणत्या भाजप नेत्याचा मेहुणा क्रुझ रेव्ह पार्टीत होता? मंत्री नवाब मलिक उद्या मोठा गौप्यस्फोट करणार
त्यावेळी एनसीबीच्या अधिकाऱ्यांना या क्रुझवर मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा सापडला होता. याच पार्टीत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सापडल्याने एकच खळबळ माजली आहे.
मुबई-गोवा-मुंबई क्रुझवर (Cruise Rave Party) आयोजित करण्यात आलेल्या पार्टीवर एनसीबीने (NCB) सोमवारी छापा मारला. त्यावेळी एनसीबीच्या अधिकाऱ्यांना या क्रुझवर मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा सापडला होता. याच पार्टीत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सापडल्याने एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, या कारवाईची संपूर्ण देशभरात चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या क्रुझ रेव्ह पार्टीत आर्यन खान यांच्यासहीत 10 जणांना पडकडण्यात आले होते. मात्र, त्यापैकी 2 जणांना सोडण्यात आले आहे. यापैकी एक भाजपच्या एका नेत्याचा मेहुणा होता, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच याबाबत नबाव मलिक उद्या पत्रकार परिषद घेऊन त्या नेत्याचे नाव घोषीत करणार आहेत.
नवाब मलिक म्हणाले की, "एनसीबीच्या सुरु असलेल्या चुकीच्या कारवाईसंदर्भात मला माहिती उघड करायची आहे. यासाठी थोडा वेळ लागणार असून याप्रकरणी शनिवारी पत्रकार परिषद घेणार आहे. नवाब मलिक यांच्या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात थिणगी पडण्याची शक्यता आहे. तसेच नवाब मलिक उद्या भाजपच्या कोणत्या नेत्याचे नाव घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे देखील वाचा- Kirit Somaiya Criticizes Ajit Pawar: आयकर विभागाच्या कारवाईनंतर किरीट सोमय्या यांची अजित पवार यांच्यावर टीका
परमबीरसिंग, शर्मा हे जनतेचे सेवक होते. मात्र, हे देशसेवा करण्याऐवजी दुसरे धंदे करीत होते. ज्यांचे नाव घेणार आहे, हा व्यक्तीदेखील तसाच आहे. हळूहळू याचा सगळा खुलासा करणार असल्याचा गौप्यस्फोट नवाब मलिक यांनी केला आहे. कलाकारांकडून यांनी पैसे घेतले आहेत. दोन ग्रॅम, चार ग्रॅमसाठी पैसे घेतले. त्यांच्यापेक्षा आमच्या राज्यसरकारच्या नार्कोटिक्स विभागाने काल दिवसभरात मोठ्या कारवाया केल्या त्यामध्ये 20 किलो ड्रग्ज पकडले आहेत. त्यांची कामे आमचा विभाग करतो आहे.जसजसे पुरावे हातात लागतील तसतशी यांची पोलखोल करणार आहे असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
अजित दादांच्या कंपन्यांवर आयकर विभागाची कारवाई होते आहे आम्ही त्यांना सांगू इच्छितो की, ते या प्रकरणात अगोदर खुलासे मागू शकले असते परंतु त्यांनी तसं न करता केवळ बदनामी करण्याचा प्रकार केला आहे. अशा प्रकारच्या कारवाई विरोधात कोर्टात जाणार आहोत असेही नवाब मलिक म्हणाले. महाविकास आघाडी सरकारचे नेते कुणाला घाबरणार नाहीत. महाराष्ट्राची जनता सगळं पाहत आहेत. भ्रष्टाचार मुक्त करणे म्हणजे भाजपच्या गंगेत डुबक्या मारणे असं आहे का? आता जे भाजपमध्ये गेले त्यांनी भाजपच्या गंगेत डुबकी मारली आहे. भाजपच्या काही आजी - माजी मंत्र्यांनी बऱ्याच बँका बुडवल्या आहेत. त्यांची प्रकरणे देखील आम्ही बाहेर काढणार आहोत. नुसते आम्ही आरोप करत बसत नाही. पुराव्यासकट आम्ही आरोप करणार आहोत असेही नवाब मलिक यांनी सांगितले. दरम्यान काही बाहेरचे हायप्रोफाईल लोकं हे सगळं प्रकरण हँडल करत आहेत असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.