मंत्रीमंडळ विस्ताराबाबत जेव्हा ठरेल तेव्हा सांगितले जाईल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मात्र, अजूनही मंत्री मंडाळाचा विस्तार झाला नसल्यामुळे विरोधीपक्षाकडून नव्या सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
महाराष्ट्रात (Maharashtra) शिवसेना, काँग्रेस- राष्ट्रवादी यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन केले आहे. मात्र, अजूनही मंत्री मंडाळाचा विस्तार झाला नसल्यामुळे विरोधीपक्षाकडून नव्या सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. नुकतीच अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निवासस्थानी मंत्रीमंडळ विस्ताराबाबत देवगीरी येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत निर्णय घेण्यात येणार, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत जेव्हा ठरेल तेव्हा सांगितेल जाईल, असे विधान करुन मुख्यमंत्री यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर विराजमान झाल्यानंतर लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली होती. मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात नुकतीच बैठक पार पडली आहे. अजित पवार यांचे निवासस्थान देवगीरी येथे तब्बल दीड तास चर्चा सुरु होती. परंतु, बैठक संपल्यानंतर पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना मंत्रीमंडळाबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत नवे काही घडलेले नसून जेव्हा ठरेल तेव्हा माध्यामांना सांगितले जाणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच या बैठकीत शेतकऱ्यांविषयी मुद्दा मांडण्यात आला आहे, अशी माहिती समोर आली आहे. हे देखील वाचा- 'गरीबांना 3 चाकीच रिक्षाच परवडते' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला
सरकार स्थापन होऊन अनेक दिवस उलटले तरीदेखील मंत्रीमंडाळाचा विस्तार झाला नाही. यामुळे महाराष्ट्राला पडलेले प्रश्न कोणाला विचारायचे असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. आज पार पडलेल्या बैठकीत मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत निर्णय घेण्यात येणार, अशी अपेक्षा केली जात आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानामुळे हिवाळी अधिवेशनानंतर मंत्री मंडळाचा विस्तार केला जाणार, असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.