Pune Drug Girl Video: पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? नशेत बेधुंद असलेल्या तरुणींचा हादरवणारा Video व्हायरल

शहर पोलिसांनी नुकताच 4 हजार कोटीचा गंजा जप्त केला होता. शिक्षणाचे माहेर घर असलेल पुणे आता बदलत असल्याचे चित्र दिसत आहे.

Pune Girl Drugs Video PC INSTA

Pune Drug Girl Video:  पुण्यात ड्रग्ज प्रकरण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. शहर पोलिसांनी नुकताच 4 हजार  कोटीचा गंजा जप्त केला होता. शिक्षणाचे माहेर घर असलेल पुणे आता बदलत असल्याचे चित्र दिसत आहे. अवघ्या 16,17 वर्षांच्या मुली खुल्ले आम ड्रग्ज घेत असल्याचे सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अभिनेता रमेश परदेशी उर्फ 'पिट्या भाई' यांनी शेअर केला आहे. पुण्यातील वेताळ टेकडीवरील हा व्हिडिओ आहे. व्हिडिओत दोन तरुणी ड्रग्जच्या नशेत बेधुंद आहेत. हे पाहून नागरिकांना धक्काच बसला आहे. पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या तरुणीने काय अवस्था करून घेतली आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून समोर येत आहे. (हेही वाचा-  पुण्यात 3700 कोटी रूपयांचे ड्रग्ज जप्त करणाऱ्या पुणे पोलिस पथकाला Devendra Fadnavis यांच्याकडून 25 लाखांचे बक्षीस जाहीर)

व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, पुण्यातील वेताळ टेकडीवर नशेत गुंग असणाऱ्या दोन तरुणी आहे. टेकडीवर बसून दोघींनी नशा केली. एक तरुणी बेशुध्य अवस्थेत जमिनीवर पडली आणि दुसरी ही नशेत बडबडताना दिसत आहे. घटनास्थळी आणखी काही तरुणमंडळी आहे जे या दोघींना होशमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओ शेअर करणारे रमेश परदेशी यांनी सांगितले की, वेताळ टेकडीववर आम्ही पळायला आलो होतो. तर इथं कॉलेजच्या पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या दोन तरुणी, बिअर, दारू आणि नशेचं काहीतीर घेऊन टेकडीच्या कोपऱ्यात पडल्या होत्या. या तरुणींना आम्ही इथं सेफ जागी घेऊन आलो. हे यासाठी सांगतोय कारण पुण्यात दोन दिवसांपूर्वी ४ हजार कोटींचं ड्रग्ज सापडलं आहे. आम्ही त्यांना रुग्णालयात नेत आहोत. परंतु एक पालक, सजग नागरिक, भाऊ, बहिण म्हणून आपण याकडे गांभीर्याने बघणार आहोत की नाही? असा रोखठोक प्रश्न रमेश परदेशी यांनी विचारला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by MNCKS_Pune / मनसे चित्रपट सेना,पुणे (@mnckspune)

व्हिडिओत रमेश यांनी मुलांच्या पालकांना देखील याकडे लक्ष देण्याचे सांगितले आहे. पालकांवर आरोप करत त्यांना समजवून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेनंतर पुणे शहर संपुर्ण हादरून गेले आहे. पुण्यातील ड्रग्ज प्रकरणाला आळा कधी बसेल असा प्रश्न नागरिकांकडून येत आहे.