पश्चिम रेल्वेकडून पालघर येथे 23 कोविड केअर कोचची व्यवस्था
याचा वापर कोरोनाच्या रुग्णांसाठी केला जाणार आहे.
पश्चिम रेल्वेकडून (Western Railway) लांब पल्ल्याच्या 23 विनावातानुकूलित कोचची व्यवस्था पालघर(Palghar) जिल्ह्यात आयसोलेशन वॉर्ड म्हणून व्यवस्था करण्यात आली आहे. याचा वापर कोरोनाच्या रुग्णांसाठी केला जाणार आहे. पालघर हा आदिवासी पट्टा पडत असल्याने वैद्यकिय सेवासुविधांचा अभाव आहे. पालघर जिल्ह्याधिकारी माणिक गुरसळ यांनी पश्चिम रेल्वेला 30 एप्रिलला पश्चिम रेल्वेला विनंती केली होती. मुंबईपासून 125 किमी अंतरावर पालघर आहे.(21 एप्रिल ते 9 मे 2021 या कालावधीसाठी महाराष्ट्राला मिळाल्या रेमडेसिविरच्या 8,09,500 कुप्या)
जिल्हाधिकाऱ्यांनी पश्चिम रेल्वेला लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, पालघर हा एक नवा आदिवासी जिल्हा आहे. येथे सध्या 17,500 कोरोनाग्रस्त रुग्ण असून येथील रुग्णालयातील सुद्धा बेड्स पूर्णपणे भरले आहेत. त्यामुळे प्रत्येकी 500 रुग्ण हे डहाणू, भोईसर, पालघर आणि वसई येथील असे एकूण 2 हजार रुग्ण आहेत. त्यांच्यासाठी मेडिकल कोच क्वारंटाइनसाठी द्यावेत अशी विनंती केली होती.
पश्चिम रेल्वेचे पब्लिक रिलेशनचे प्रमुख सुमीत ठाकूर यांनी असे म्हटले की, आम्ही 24 विनावातानुकूलित कोच पाठवत आहोत. त्यामध्ये 23 कोच रुग्णांसाठी आणि एक डॉक्टरांसाठी कोच राखून ठेवला आहे. हे कोच रविवारी संध्याकाळी किंवा सोमवार पर्यंत पूर्ण होणार आहेत. एकूण 414 रुग्णांची या सर्व कोचमध्ये व्यवस्था होणार आहे.(Maharashtra: ठाण्यातील 'त्या' 5 कोरोनाबाधितांचा मृत्यू ऑक्सिजन अभावी नव्हेतर 'या' कारणांमुळे झाला, महत्वाची माहिती समोर)
दरम्यान, 18-44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण राज्य सरकार कडून होणार आहे. त्यामुळे केंद्राप्रमाणे हे लसीकरण देखील सरकारी रूग्णांलयांमध्ये मोफत असणार आहे. राज्य सरकारच्या सोबतीने अनेक कंपन्यादेखील त्यांच्या नागरिकांचे लसीकरण करणार आहेत. यामध्ये रिलायंस फाऊंडेशन कडून एका विशेष उपक्रमाद्वारा त्यांच्या कर्मचार्यांचे आणि त्यांच्या परिवारातील नागरिकांचे लसीकरण होणार आहे.