25 डिसेंबर पासून भाईंदर-चर्चगेट आणि वसई-चर्चगेट दोन नव्या लेडीज स्पेशल लोकल धावणार!
पश्चिम रेल्वेने (Western Railway) मुंबईकर महिलांसाठी ख्रिसमस भेटच्या स्वरूपात दोन नव्या लेडीज स्पेशल गाडयांची (Ladies Special Local) घोषणा केली आहे.
पश्चिम रेल्वेने (Western Railway) मुंबईकर महिलांसाठी ख्रिसमस भेटच्या स्वरूपात दोन नव्या लेडीज स्पेशल गाडयांची (Ladies Special Local) घोषणा केली आहे. या गाड्या केवळ महिला प्रवाशांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आता पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या महिला विशेष गाड्यांची संख्या 10 झाली आहे. दोन्ही नव्या गाड्या या स्लो लोकल्स (Slow Local) असतील. भाईंदर आणि वसई स्थानकापासून चर्चगेट अशा धावणार आहेत.
नव्या लेडीज स्पेशल गाड्यांचं वेळापत्रक
पहिली लेडीज स्पेशल गाडी भाईंदर स्थानकावरून सकाळी 9.06 मिनिटांनी सुटेल, ती चर्चगेटला 10.30 मिनिटांनी पोहचणार आहे.
दुसरी लेडीज स्पेशल गाडी वसई स्थानकावरून सकाळी 10.04 मिनिटांनी सुटेल ती चर्चगेटला 11.30 मिनिटांनी पोहोचणार आहे.
पश्चिम रेल्वेने नव्या रेल्वे गाड्यांची घोषणा करताना काही रेल्वे लोकल्स रद्द केल्या आहेत तर काही गाड्यांच्या वेळेमध्ये बदल केले आहेत. यामध्ये विरार स्थानकातून सुटणारी लेडीज स्पेशल आता 8 वाजून 56 मिनिटांनी सुटणार आहे. तर सकाळच्या वेळेत धावणाऱ्या चर्चगेट वांद्रा गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.