पश्चिम महाराष्ट्रात भाजपने आयोजित केलेल्या मेळाव्यात उदयनराजे भोसले गैरहजर, चर्चांना उधाण
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची सुद्धा पक्षात प्रवेश करण्यापूर्वी भेट घेतल्याने चर्चा अधिकच रंगल्या होत्या.
आगामी विधानसभा निवडणूकीपूर्वी सातारा (Satara) मधील माजी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी राष्ट्रवादी (NCP) पक्षाला रामराम करत भाजप पक्षात एन्ट्री केली होती. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची सुद्धा पक्षात प्रवेश करण्यापूर्वी भेट घेतल्याने चर्चा अधिकच रंगल्या होत्या. मात्र अखेर दिल्ली येथे जाऊन उदयनराजे यांनी अमित शहा (Amit Shah) यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात अधिकृतरित्या प्रवेश केला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या विचारांसोबत प्रेरित होऊन भाजप पक्षात प्रवेश करत असल्याची भावना उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली होती. मात्र पश्चिम महाराष्ट्रात भापजकडून आयोजित करण्यात आलेल्या पहिल्यात मेळाव्यात उदयनराजे गैरहजर राहिले होते. मात्र मेळाव्याला हर्षवर्धन पाटील, रणजित मोहिते पाटील आणि धननंजय महाडिक यांची उपस्थिती दिसून आली.
देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा निवडणूकीपूर्वीच्या महाजनादेश यात्रेच्या समारोमासाठी काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी नाशिक दौरा केला होता. त्यावेळी उदयनराजे व्यासपीठावर एका बाजूला उभे राहिले असल्याचे दिसून आले होते. त्यांचा फोटो सुद्धा सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत उदयनराजे यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी खंत व्यक्त केली होती. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील मेळाव्याला अनुपस्थित राहिल्याने उदयनराजे यांच्याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे.(खासदार उदयनराजे भोसले भाजपात आल्यास आनंदच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली भावना)
तर उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आव्हाड यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, शरद पवार साहेब तुम्ही उदयनराजे यांच्यावर मनापासून प्रेम केले. साताऱ्यामधील निकटवर्तीयांना तुम्ही दुखावले आणि सगळ्या गोष्टी सुद्धा सहन केल्यात. परंतु तु्म्हाला साहेब काय मिळाले असा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच शरद पवार यांनी उदयनाराजे यांनी पक्ष सोडल्याबाबत मौन पाळले असल्याचे साताऱ्यामधील एका सभेदरम्यान दिसून आले.