Mumbai Rains: मस्जिद रेल्वे स्थानक रेल्वे ट्रॅकवर पाणीच पाणी; हार्बर रेल्वे 20 मिनिटं उशिराने सुरू (Video)

मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु आहे. पुढील काही तासांत जोरदार पाऊस होण्याचा अंदाज. मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली आहेत. हार्बर सेवा 20 मिनिटे उशीराने सुरू आहे.

Mumbai Rains: मस्जिद रेल्वे स्थानक रेल्वे ट्रॅकवर पाणीच पाणी; हार्बर रेल्वे 20 मिनिटं उशिराने सुरू (Video)
Photo Credit- X

Mumbai Rains: हवामान खात्याने मुंबईत पुढील दोन ते तीन तासांत मुसळधार पाऊस आणि वेगाने वारे वाहतील, असा अलर्ट दिला होता. त्यानुसार, गेल्या तासाभरापासून मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरात सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. पावसामुळे आज सकाळपासूनच मुंबईतील (Mumbai Rains) मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वेचा वेग मंदावला होता. अनेक रेल्वे स्थानकातीन रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याचे व्हिडीओसमोर आले आहेत. माटुंगा रेल्वे स्थानकात जास्त पाणी साचले आहे. अशीच स्थिती मस्जिद बंदर रेल्वे स्थानकात पहायला मिळत आहे. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल  (Water logged at Masjid Bunder station)आहे. त्यामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. ट्रेनचा वेग आणखी मंदावला आहे.

Mumbai High Tide Timing Today: पावसाचा रेड अलर्ट; समुद्रात 4.75 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता (Video)

यामुळे सकाळी कामावर जाण्यासाठी बाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होण्याची शक्यता आहे. ठाणे स्टेशनवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या जलद आणि धिम्या गतीच्या लोकल गाड्या या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. लोकल गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत (Mumbai Local Train) असल्याचे अनाउन्समेंट सुद्धा रेल्वे स्थानकावर केली जात आहे. मध्य रेल्वेच्या मशीद बंदर रेल्वे स्थानकातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले (Heavy Rain in Mumbai) आहे. साचलेले पाणी जवळपास फलाटाच्या उंचीला पोहोचल्याने मध्ये रेल्वेची धीम्या मार्गावरील वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे.

रायगडमध्ये मुसळधार पाऊस

मुंबई,अंबरनाथ, बदलापू, कर्जतमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. ठाण्यात तुरळक पावसाच्या सरी बरसत आहेत. कर्जतमध्ये जोरदार पावासाने मे महिन्यातच उल्हास नदीला पूर आला आहे. या नदीवरील नेरळ दहिवली येथील पुलावरून सध्या पाणी वाहत आहे.

(The above story first appeared on LatestLY on May 26, 2025 11:27 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).