Mumbai Water Taxi: मुंबईत वॉटर टॅक्सी सेवा होणार स्वस्त; करमाफीनंतर भाडयात करण्यात येणार कपात

करात सूट मिळण्याचा परिणाम भाड्यावरही होणार असून भाडे 10 टक्क्यांनी कमी होणार आहे.

Water Taxi (PC -Wikimedia Commons)

Mumbai Water Taxi: मुंबईत (Mumbai) नुकत्याच सुरू झालेल्या वॉटर टॅक्सीतून (Water Taxi) प्रवास करणे आता स्वस्त होणार आहे. महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) आपल्या अर्थसंकल्पात वॉटर टॅक्सींच्या वापराला चालना देण्यासाठी वॉटर टॅक्सीवरील कर तीन वर्षांसाठी माफ केला आहे. यानंतर वॉटर टॅक्सीचे भाडे 10 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. भाडे कमी असल्याने वॉटर टॅक्सी प्रवासीही वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि मुंबईतील लोकांचा प्रवास सुलभ करण्यासाठी 17 फेब्रुवारी 2022 रोजी मुंबई ते नवी मुंबई दरम्यान वॉटर टॅक्सी सुरू करण्यात आली. त्यामुळे मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास कमी वेळात पूर्ण करता येणार आहे. मात्र, असे असतानाही वॉटर टॅक्सींना दररोज अपेक्षेपेक्षा कमी प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. (वाचा - PCMC Recruitment 2022: आरोग्य सेविका पदावर होणार थेट मुलाखती द्वारा नोकरभरती; इथे पहा सविस्तर अर्ज प्रक्रिया)

आता महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या (Maharashtra Maritime Board) क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांना तीन वर्षांसाठी करात सवलत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानंतर अधिकाधिक लोकांना शहरात येण्यासाठी कमी भाडे द्यावे लागेल, अशी अपेक्षा आहे.

एका अहवालात, एका वॉटर टॅक्सी ऑपरेटरने सांगितले की, या सेवेसाठी मेरी टाईम बोर्डला 10 टक्के कर भरावा लागेल. करात सूट मिळण्याचा परिणाम भाड्यावरही होणार असून भाडे 10 टक्क्यांनी कमी होणार आहे.