Mumbai Rains: मुंबई सह उपनगरांमध्ये पावसाची दमदार हजेरी; सायन परिसरातील सखल भागात पाणी साचले (See Pics)

त्यामुळे सायन परिसरातील सखल भागात पाणी साचले आहे. पहा फोटोज...

Water-logging in parts of Sion, Mumbai (Photo Credits: ANI)

निसर्ग चक्रीवादळाचा धोका टळल्यानंतर आज सकाळपासूनच मुंबई (Mumbai) आणि उपनगरांमध्ये मेघगर्जनेसह दमदार पावसाने हजेरी लावली. यामुळे सायन (Sion) परिसरातील सखल भागात पाणी साचले आहे. सायन परिसरात पाणी साचल्याचे काही फोटोज समोर आले आहेत. दरम्यान 1 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार असून जूनच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत मान्सून पूर्व पाऊस होईल, असा अंदाज मुंबई हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार मुंबईसह उपगनरांमध्ये जोरदार सरी बसरसत आहेत. हा मान्सून पूर्व पाऊस असला तरी 11 जून पर्यंत मुंबईत मान्सूनचे आगमन होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचबरोबर यंदा समानाधकारक पावसाचा अंदाज आहे.

मुंबई सह ठाणे, नवी मुंबईतही आज सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सायन परिसरातील सखल भागात पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्यातून वाहतूक होत असून ट्रॅफिक पोलिसही भर पावसात वाहनांना दिशा दाखवताना दिसत आहेत. तर दुचाकीस्वार गाडी ढकलत नेताना दिसत आहे. (Mumbai Rains: मुंबई, ठाणे शहरामध्ये दमदार पावसाला सुरूवात; पुढील 3 तास जोरदार सरी बसरण्याचा हवामान खात्याचा अंदाज)

ANI Tweet:

यंदा कोरोना व्हायरसचे संकट उभे ठाकले असल्याने मान्सूनचाही मनमुराद आनंद घेता येणे शक्य होणार नाही. लॉकडाऊन 5 च्या निर्बंधनात शिथिलता आली असली तरी खबरादारी घेणे आवश्यक आहे. दरम्यान अनलॉक 1 च्या माध्यमातून राज्यातील अनेक सेवा-सुविधा पुन्हा सुरु होण्याच्या मार्गावर आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif