मुंबई मध्ये महानगरपालिकेकडून (BMC) पुढील आठवड्यात 24 तासांसाठी पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे. बीएमसीकडून विद्याविहार (Vidyavihar) परिसरात हाती घेण्यात आलेल्या कामामुळे हा पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे. दरम्यान बुधवार 18 मे सकाळी 10 वाजल्यापासून गुरूवार 19 मे सकाळी 10 वाजेपर्यंत असा 24 तास हा पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे.
बीएमसी ने दिलेल्या माहितीनुसार, पूर्वउपनगरांमध्ये काही ठिकाणी 24 तास पाणी पुरवठा बंद ठेवला जाईल तर उर्वरित काही भागांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार आहे. कुर्ला, चेंबूर, घाटकोपर, सायन, किंग सर्कल, माटुंगा, परेल या भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार असल्याची माहिती बीएमसीने दिली आली आहे.
बीएमसी वॉर्ड नुसार कुठे पाणी पुरवठा विस्कळीत होईल
- एल पूर्व - राहुल नगर, एडवर्ड नगर, पानबजार, व्ही. एन. पूरव मार्ग, नेहरू नगर दोन्ही बाजू, जागृती नगर, शिवसृष्टी नगर, एस. जी. बर्वे मार्ग, कसाईवाडा पम्पिंग, हिल मार्ग, चाफे गल्ली, चुनाभट्टी पम्पिंग स्वदेशी मिल मार्ग
- एन - राजावाडीचे सर्व क्षेत्र, चित्तरंजन नगर वसाहत, आंबेडकर नगर, नीळकंठ व्हॅली, राजावाडी रुग्णालय परिसर, विद्याविहार स्थानक पूर्वेकडील रस्ता, ओएनजीसी वसाहत मोहन नगर, कुर्ला टर्मिनल मार्ग, ओघड भाई रस्ता, आनंदी रस्ता रामजी, आशर रस्ता
- एम पश्चिम - टिळक नगर सर्व क्षेत्र, ठक्कर बाप्पा वसाहत, वत्सलाताई नगर, सहकार नगर, आदर्श नगर, राजा मिलिंद नगर, राजीव गांधी नगर, गोदरेज आवार, कुटीरमंडल, सम्राट अशोक नगर.
- एफ उत्तर - वडाला ट्रक टर्मिनल, न्यू कफ परेड, प्रतीक्षा नगर, पंचशील नगर, शीव पूर्व आणि पश्चिम, सायन कोळीवाडा, संजय गांधी नगर, के. डी. गायकवाड नगर, सरदार नगर, इंदिरा नगर, वडाला मोनोरेल डेपो.
- एफ दक्षिण - दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, जगन्नाथ भातनकर मार्ग, बी. जे. देवरुखकर मार्ग, गोविंदजी केणे मार्ग, हिंदमाता, परळ, लालबाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, डॉ. एस. एस. राव मार्ग, दत्ताराम लाड मार्ग, जिजीभॉय गल्ली, महादेव पालव मार्ग, साने गुरुजी मार्ग, गॅस कंपनी गल्ली
मुंबई महापालिकेकडून शहराच्या पूर्व उपनगरातील एन विभागात जलवाहिन्यांचे काम केले जाणार आहे. यामध्ये सोमय्या नाल्याखाली मायक्रोटनेलिंग पद्धतीने काम करणार असल्याने हा पाणी पुरवठा बंद केला जाणार आहे. त्यामुळे त्या 24 तासांसाठी मुंबईकरांनी पुरेसा पाणीसाठा करावा असं आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.