Nashik: नाशिकमधील गावात जलसंकट; पिण्याच्या पाण्यासाठी महिला उतरल्या विहिरीत, Watch Video
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Nashik: नाशिकमधील अनेक गावं जलसंकटाचा (Water Crisis) सामना करत आहेत. पाण्याची दैनंदिन गरजा भागवण्यासाठी या गावातील लोक पाण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहेत. पेईंट गावातील महिला या संकटाला तोंड देण्यासाठी विहिरी उतरून पिण्याचं पाणी आणत आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने बुधवारी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये अनेक गावकरी पाणी घेण्यासाठी स्थानिक विहिरीला वेढा घालताना दिसत आहेत. या विहिरीमध्ये फारसे पाणी दिसत नाही. विहिरीत पाणी नसल्याने अनेक बायका विहिरीत उतरताना दिसत आहेत. (हेही वाचा - Mumbai Trans Harbour Linkबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी दिली आकडेवारी, केले मोठे दावे घ्या जाणून)
दरम्यान, आदिवासी विकास मंत्री आणि भाजप नेते विजयकुमार कृष्णराव गावित यांनी ANI शी बोलताना सांगितले की, 2024 पर्यंत प्रत्येक गावात पाण्याची सुविधा असेल. मात्र, नाशिकमधील नुकत्याच आलेल्या व्हिज्युअल्समध्ये वेगळेच दृश्य समोर येत आहे.