Watch Video: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी मेळाव्यात स्वयंसेवकांकडून हवेत गोळीबार; पोलिसांकडून कारवाईचे संकेत

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या (RSS) विजयादशमी मेळाव्यात (Vijayadashmi Melava) स्वयंसेवकांकडून हवेळ गोळीबार (Firing) करण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Firing (Photo Credit: ANI)

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या (RSS) विजयादशमी मेळाव्यात (Vijayadashmi Melava) स्वयंसेवकांकडून हवेळ गोळीबार (Firing) करण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा प्रकार मंगळवारी उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) येथील सीतापूर (Sitapur) येथे घडला आहे. एएनआय (ANI) वृत्त संस्थेने हा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत खात्यावर शेअर केला आहे. दरम्यान, संघाच्या स्वयंसेवकांनी हातात रायफल घेवून हवेत गोळीबार करत असल्याचे दिसत आहे. सीतापूर येथील सहायक पोलीस अधीक्षक मधुबन प्रताप सिंह (Madhuban Pratap Singh) यांनी याप्रकरणी कारवाईचे संकेत दिले आहे.

एएनआय चा व्हिडिओ-