Thane Railway Station: ठाणे रेल्वे स्थानकात धावत्या रेल्वेतून उतरणाऱ्या महिलेचा थोडक्यात बचावला जीव; पाहा व्हिडिओ

परंतु. गडबडीत असल्याने अनेक प्रवासी आपला जीव धोक्यात घालून रेल्वे चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करतात. हे प्रयत्न अनेक प्रवाशांच्या जीवावर बेतल्याचे आपण पाहिले आहे.

Thane Railway Station (Photo Credit: Twitter)

धावत्या रेल्वेतून चढू अथवा उतरू नका, असे प्रशासनाकडून वारंवार सांगितले जाते. परंतु. गडबडीत असल्याने अनेक प्रवासी आपला जीव धोक्यात घालून रेल्वेत चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करतात. हे प्रयत्न अनेक प्रवाशांच्या जीवावर बेतल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. दरम्यान, ठाणे स्थानकावरील (Thane Railway Station) अशीच एक घटना समोर आली आहे. ठाणे रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेतून उतरण्याचा महिला प्रवाशाने प्रयत्न केला. त्यावेळी या महिलेचा तोल गेल्याने ती खाली कोसळली. सुदैवाने, त्याठिकाणी उपस्थितीत असलेल्या पोलिसांनी या महिलेचा जीव वाचवला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे रेल्वे स्थानकांवर सकाळी दहाच्या सुमारास ही घडली आहे. ठाणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 5 वर महानगरी एक्स्प्रेस गाडी आली होती. या धावत्या रेल्वेतून एका महिलेने उतरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिलेचा तोल जाऊन ती खाली रेल्वे प्लॅटफॉर्मवर पडली. मात्र, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या रेल्वे पोलिसांच्या सावधानीमुळे मोठा अनर्थ टळला आहे. हे देखील वाचा- Maharashtra Police Bharti 2021: पोलीस भरतीसंदर्भात गृहमंत्रालयाकडून GR जारी; SEBC आरक्षण न ठेवता भरती प्रक्रिया पार पाडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय

ट्विट-

रेल्वेतून प्रवास करताना प्रवाशांच्या हलगर्जीपणामुळे त्यांनी स्वत:चा जीव गमवला आहे. यात पुरुष, महिला यांच्यासह तरूणांचाही समावेश आहे. यातील काही तरूणांचा स्टंटबाजी करण्याचा नादात मृत्यू झाला आहे. यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडून वारंवार जनजागृती करण्यात येते. मात्र, तरीही अशाप्रकारच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत.