Washim Shocker: हुंड्यासाठी आणखी एका नवविवाहीत महिलेची हत्या, वाशिम येथील ह्रदयद्रावक घटना
या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.
Washim Shocker: वाशिम (Washim) जिल्ह्यात हुंड्यासाठी (Dowery) एक नवविवाहीत महिलेची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. लग्नाला अवघ्ये काही महिने सुध्दा झाले नव्हते आणि हुंडाबळीसाठी महिलेचा खून केला. ही घटना वाशिम येथील वाघजाळी गावात घडली आहे. मेघा शिंदे असं हत्या झालेल्या तरुणीची नाव आहे.तिच्या पतीने हुंडासाठी गळा चिरून हत्या केली. या घटनेने गाव हादरलं आहे. (हेही वाचा- हुंडा मागणाऱ्या व्यक्तीची मद्यधुंद अवस्थेत गर्भवती पत्नीला मारहाण; गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल)
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यापूर्वीचं मेघा शिंदे हीचं लग्न वाघजाळी येथील गजानन शिंदे नावाच्या तरुणाशी झाला. लग्नात गजानन यांने हुंडा मागितला होता, मात्र जमेल तेवढं तरुणीच्या कुटुंबियांनी गजाननला हुंडा दिला. त्यानंतर ही लग्न झाल्यानंतर कार घेण्यासाठी माहेरातून पैसै आणण्यासाठी पत्नीला छळायला लागला.त्यामुळे सासरच्या मंडळीकडून कायम मारहाण आणि शिवीगाळ होत असल्याचे तक्रारीत म्हटलं.
मेघा, सासू आणि सासऱ्या सोबत शेतात गेली आणि त्यानंतर पत्नी गजानन देखील आला. शेतात चौघांमध्ये पैशांवरून वाद झाला आणि. मेघाला माहेरातून पैसे घेऊन येण्यास सांगत होता. यांच्यात वाद झाल्यानंतर रागाच्या भरात गजाननने शेतात मेघाचा गळा चिरला. जखमी अवस्थेत ती जमीनीवर पडली आणि तिचा मृत्यू झाला.तीला रुग्णालयात दाखल केले परंतु तिचा मृत्यू झाला. त्यानंतर गजानने देखील विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु वेळ निघण्याच्या आधीच त्याला रुग्णालयात दाखल केले आणि त्याचा जीव वाचवला.
माहेरच्या मंडळीनी पोलिसांत मेघाच्या खूनाची तक्रार केली आणि पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, आरोपीवर गुन्हा दाखल केला. आरोपी गजाननला पोलिसांनी अटक करून कोठडीत ठेवले आहे. पोलिस या घटनेत आणखी तपास करत आहे.