Vitthal Rukmini Vivah Sohala 2020: वसंत पंचमी निमित्त पंढरपूरात रंगणार विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा; पहा खास फोटो
मात्र, आज पंढरपूर येथे श्री. विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा पडणार आहे. वसंत पंचमीच्या मुहूर्तावर सनई-चौघड्यांच्या सुरात हा विवाह सोहळा पार पडणार आहे. वसंत पंचमी ते रंगपंचमीपर्यंत विठ्ठल-रुक्मिणी विवाह सोहळा पार पाडला जातो. या दिवशी देवाला शुभ्र पोशाख करून मूर्तीवर गुलालाची उधळण करण्याची परंपरा आहे.
Vitthal Rukmini Vivah Sohala 2020: आजपर्यंत तुम्ही अनेक विवाह सोहळे पाहिले असतील. मात्र, आज पंढरपूर येथे श्री. विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा पडणार आहे. वसंत पंचमीच्या मुहूर्तावर सनई-चौघड्यांच्या सुरात हा विवाह सोहळा पार पडणार आहे. वसंत पंचमी ते रंगपंचमीपर्यंत विठ्ठल-रुक्मिणी विवाह सोहळा पार पाडला जातो. या दिवशी देवाला शुभ्र पोशाख करून मूर्तीवर गुलालाची उधळण करण्याची परंपरा आहे.
आज सकाळपासून पंढरपुरात या आगळ्यावेगळ्या विवाहाची धामधूम सुरू झाली आहे. देवाच्या या विवाहसोहळ्याला हजेरी लावण्यासाठी राज्यभरातून हजारो भाविकांनी पंढरीत गर्दी केली आहे. या विवाहसोहळ्यासाठी विविध रंगांच्या रंगीबेरंगी फुलांनी मांडव अर्थात विठुरायाची राऊळी सजवली जाते. (हेही वाचा - Mahatma Gandhi Death Anniversary 2020: महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी चं औचित्य साधत पुढच्या पिढीपर्यंत नक्की पोहचवा त्यांचे हे सकारात्मक विचार!)
आज विठ्ठल मंदिरातील सभामंडपाला लग्नस्थळाचे स्वरूप देण्यात येते. विठ्ठल-रुक्मिणी स्वयंवराची कथा ऐकण्यासाठी हजारो महिला याठिकाणी गर्दी करतात. आज रुक्मिणीमातेच्या मूर्तीला हिरवी भरजरी पैठणी नेसवण्यात येते. तसेच विठुरायाला पांढरेशुभ्र करवतकाठी धोतर, पांढरी अंगी आणि पांढरी पगडी परिधान करून सजवण्यात येते. देवाचे गाभारे आकर्षक गुलाब आणि इतर फुलांनी अतिशय आकर्षक पद्धतीने सजले जातात. वसंत पंचमी असल्याने विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या मूर्तीवर गुलालाची उधळण करण्यात येते. वसंत पंचमी ते रंगपंचमीपर्यंत देवाला शुभ्र पोशाख आणि मूर्तीवर गुलालाची उधळण करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून चालत आली आहे.