Virar Hospital Fire Incident: विरारच्या Vijay Vallabh COVID Care Hospital आग दुर्घटनेप्रकरणी केंद्र सरकार कडून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख तर राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर

विरार आग दुर्घटनेमध्ये मृतांच्या परिवाराला प्रत्येकी 7 लाख तर जखमींसाठी प्रत्येकी दीड लाखांची मदत सरकारकडून जाहीर झाली आहे.

Virar Hospital Fire Incident । Photo Credits: ANI/PIB

महाराष्ट्रामध्ये एकीकडे कोरोना संकट गंभीर होत असताना दुसरीकडे हॉस्पिटलमधील दुर्घटनांचे सत्र कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. आधी भंडारा रूग्णालयात आग नंतर नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे रूग्ण दगावले आणि आता काल रात्री विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयात आग लागल्याने 13 जण होरपळून मृत्यूमुखी पडल्याची घटना समोर आली आहे. देशभरातून या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला जात आहे. दरम्यान मुख्यमंट्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील याबाबत शोक व्यक्त करत मृतांच्या वारसांना मदतीचा हात दिला आहे. या दुर्घटनेमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांना एकूण 7 लाखांची मदत जाहीर झाली आहे. नक्की वाचा:   Virar Covid Care Fire: विजय वल्लभ कोविड केअरच्या ICU विभागात आग; 13 जणांचा मृत्यू.

सकाळी पंतप्रधान कार्यलयातून विरार दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करताना PMNRF कडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी 2 लाखांची मदत तर गंभीररित्या जखमींच्या कुटुंबांना प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

पीएमओ ट्वीट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील सकाळी विरारच्या दुर्घटनेची दखल घेतली आहे. यामध्ये विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयातील आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख आणि गंभीर जखमी रुग्णांना प्रत्येकी 1 लाख रुपये मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे.

सीएमओ ट्वीट

दरम्यान ही दुर्घटना काल रात्री साडेतीन च्या सुमारास घडली आहे. त्यानंतर आज सकाळी पालघरचे पालकमंत्री दादा भुसे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत घटनेची पाहणी केली आहे. या दुर्घटनेमध्ये जबाबदार असणार्‍यांना कडक शासन केले जाईल असे सांगताना या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असे देखील आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.