Pimpalgaon Toll Plaza Viral Video: पिंपळगाव टोलनाक्यावर महिलांमध्ये जोरदार हाणामारी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

या टोल नाक्यावर (Pimpalgaon Toll Plaza Viral Video) दोन महिलांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे.

Pimpalgaon Toll Plaza Viral Video | (Photo Credit -Twitter)

राज्यभर नेहमीच चर्चेत असलेला पिंपळगाव टोलनाका (Pimpalgaon Toll Plaza) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या टोल नाक्यावर (Pimpalgaon Toll Plaza Viral Video) दोन महिलांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. व्हायरल व्हिडिओत (Social Media) दिसत असलेल्या दोन महिलांपैकी एक महिला टोल नाक्यावरील कर्मचारी असल्याचे समजते. हा टोलनाका नाशिकजवळ (Nashik) असल्याने नाशिकही चर्चेत आले आहे. टोल नाक्यावरुन आपल्या कारने जाणारी एक महिला आणि टोल नाक्यावरील कर्मचारी यांच्यात काही किरकोळ कारमावरुन वाद झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. दोन महिला भांडत असताना बघ्यांच्या गर्दीत पुरुषांची संख्या अधिक होती. भांडणाऱ्या व्यक्ती महिला असल्याने कोणीही सोडविण्याच्या भाणगडीत पडले नाही. उलट या प्रकाराचा व्हिडिओ चित्रीत करण्यात आला, अशी प्राथमिक माहिती आहे.

झिंज्या उपटत हाणामारी

टोल नाक्यावर या दोन महिलांमध्ये बाराच वेळ हाणामारी सुरु होती. शेवटी उपस्थितांनी हे भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही महिलांनी भांडणामध्ये एकमेकिंच्या झिंज्या उपटण्याला प्राधान्य दिले होते. त्यामुळे दोघींनीही एकमेकींचे डोक्याचे केस घट्ट पकडून ठेवले होते. त्यामुळे दोघींनाही एकमेकींपासून अलग करणे उपस्थितांसाठी कठीन झाले होते. शेवटी उपस्थितांपैकी दोघातिंघांनी त्या दोघींना एकमेकींपासून वेगळे केले.

शिव्यांची लाखोली

भांडत असलेल्या त्या दोघींना एकमेकींपासून दुर करण्यात आले. परंतू, त्यांना शरीराने जरी दूर केले तरी दोघींच्या तोंडाचा पट्टा सुरुच होता. दोघीही एकमेकींना शिव्यांची लाखोली वाहात होत्या. अत्यंत अर्वाच्च भाषेत त्या एकमेकींना शिव्या देत होत्या. ही घटना उपस्थितांपैकी उत्साहींनी चित्रीत केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. (हेही वाचा, Nagpur Video: पेट्रोल पंपावरील महिला कर्मचाऱ्यांकडून तरुणीला मारहाण, पेट्रोलचे थेंब अंगावर उडल्याने वाद)

व्हिडिओ

दरम्यान, पिंपळगाव टोलनाका नेहमी चर्चेत असतो. इथले कर्मचारी नेहमीच नागरिकांना अरेरावी करतात. टोलनाक्यावरुन ये-जा करणाऱ्या वाहनचालकांशी इथले कर्मचारी योग्य भाषेत बोलत नाहीत. नेहमी हुज्जत घालत असतात. अनेकदा या ठिकाणी प्रवाशांची आणि वाहनचालकांची गैरसोय होते, अशा तक्रारी वारंवार होतात. पिंपळगाव टोलनाका प्रशासन मात्र इथे असा कोणताही प्रकार घडत नसल्याचे सांगतात.