राज्यात 5 मार्चपर्यंत 20 हजार शिक्षकभरती करणार- विनोद तावडे
5 मार्चपर्यंत राज्यात 20 हजार शिक्षकांची भरती होईल आणि ही भरती प्रक्रिया आता थांबणार नाही, असं आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी दिलं आहे.
5 मार्चपर्यंत राज्यात 20 हजार शिक्षकांची भरती होईल आणि ही भरती प्रक्रिया आता थांबणार नाही, असं आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी (Vinod Tawde) दिलं असल्याचं वृत्त एबीपी माझाने दिलं आहे.
अनेकदा डीएड, बीएड आणि टीईटी पास असलेल्यांना नोकरी न मिळाल्याने बेरोजगारीला सामोरे जावे लागते. त्यामुळे भरतीचं नवं आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी दिले आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषदेत शिक्षकांची भरती केली जाईल, असे तावडे यांनी सांगितले. मेगाभरतीनंतर राज्यात 'शिक्षक भरती'ची घोषणा; पाहा कोणत्या इयत्तांसाठी किती आहेत रिक्त जागा
यापूर्वी फेब्रुवारी 2018 पर्यंत राज्यात 24 हजार जागा भरल्या जातील, अशी घोषणा विनोद तावडेंनी केली होती. मात्र अद्याप भरती प्रक्रिया सुरु झालेली नाही. आता हे नवं आश्वासन कधीपर्यंत सत्यात उतरणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Railway Recruitment Board NTPC Exam 2025 Dates Announced: रेल्वे भरती मंडळाच्या एनटीपीसी परीक्षेच्या 2025 च्या तारखा जाहीर
Mumbai's Gokhale Bridge Set To Open Fully: मुंबईकरांना दिलासा! लवकरच अंधेरीतील गोखले पूल वाहनचालकांसाठी पूर्णपणे खुला होण्याची शक्यता; होणार, जाणून घ्या नवे अपडेट
SBI Recruitment 2025: स्टेट बँक ऑफ इंडिया करणार 18,000 कर्मचाऱ्यांची भरती; 3,000 असतील प्रोबेशनरी ऑफिसर्स, जाणून घ्या सविस्तर
Advertisement
Advertisement
Advertisement