Vinayak Mete Accidental Death: विनायक मेटेंचा कार चालक पोलिसांच्या ताब्यात, अपघातातील सर्वात मोठी अपडेट!
ड्रायव्हरला किरकोळ इजा झाली असुन पोलिसांनी ड्रायव्हरला ताब्यात घेतलं आहे.
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे कार अपघाती निधन (Accidental Death) झालं आहे. मेटे यांचा असा अकास्मात मृत्यू सगळ्याच्या मनाला चटका लावून गेला आहे. या अपघातानंतर विनायक मेटेंचा जागीच मृत्यू झाला असला तरी त्यांचा बॉडीगार्ड (Body Guard) देखील गंभीर जखमी आहे. या अपघातात मेटे यांच्या गाडीचे ड्रायव्हर एकनाथ कदम (Car driver Eknath Kadam) बचावले आहेत. ड्रायव्हरला किरकोळ इजा झाली असुन पोलिसांनी ड्रायव्हरला ताब्यात घेतलं आहे. नवी मुंबई पोलीसांनी (Navi Mumbai) त्याची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर त्याला रायगड जिल्हा पोलीसांच्या हवाली करण्यात आले आहे. कारण घडलेला प्रकार रायगड जिल्ह्याच्या हद्दीत घडला असुन ड्रायव्हरची चौकशी आता रायगड जिल्हा पोलिस करत आहेत. तसेच दुर्घटना स्थळी पोलिसांकडून सोखल चौकशी करण्यात येणार आहे.
विनायक मेटे यांचा अपघात झाला त्या ठिकाणच्या आसपासचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फोटेज (CCTV) पोलीस पडताळणार आहेत. गाडीला अपघात होण्याच्या आधीची वेळ आणि अपघाता नंतरची वेळ तपासली जाणार आहेत. तसेच अपघाताविषयी काही बारीक खूणा मिळतात का या बाबतची चौकशी देखील पोलिस करणार आहे. गाडी चालक एकनाथ कदम यांच्या सांगण्यानुसार बीडकडून (Beed) मुंबईच्या (Mumbai) दिशेने येत असताना हा अपघात झाला. ट्रकने (Truck) कट मारल्यामुळे हा अपघात झाला अशी माहिती चालकाकडून देण्यात आली आहे. तसेच अपघातानंतर मेटे संवाद साधत होते पण अपघातानंतर आम्हाला तातडीने मदत मिळाली नाही, एका तासानंतर घटनास्थळी अॅम्ब्युलंस (Ambulance) दाखल झाली, अशी माहिती चालकाकडून देण्यात आली आहे. (:- Shiv Sena VS BJP: हर घर तिरंगा अभियानारुन शिवसेना-भाजपत ट्वीटर युध्द, उध्दव ठाकरेंच्या प्रश्नांना भाजपकडून सडेतोड उत्तर)
विनायक मेटे यांच्या अपघाता प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. मेंदूला मार लागल्यानं जागेवरच मेटे यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी (Doctor) दिली आहे. हा अपघात नेमका कसा झाला याविषयी अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. तरी चालकाला ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी करण्यात येणार आहे. राज्यभरातून विनायक मेटेच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला जात आहे.