Gram Panchayat Election 2022: गेल्या २० वर्षांपासून 'या' गावाला सरपंचचं नाही, प्रशासक राज्य असणार महाराष्ट्रातील अनोख गाव

गेल्या २० वर्षांपासून हे गावं विना सरपंचाचं असुन या गावात प्रशासक राज्य आहे.

Sarpanch | (Photo credit: archived, edited, symbolic images)

राज्यभरातील हजारो ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी आज निवडणुक पार पडत आहे. ग्रामीण भागात आज निवडणुकीचा धुराळा उडणार आहे. लोकसभा-विधानसभा पेक्षाही गावात या निवडणुकीला अधिक महत्व असतं कारण या निवडणुकीत कुठला पक्ष नाही तर गावकऱ्यांची थेट प्रतिष्ठा पणाला लागलेली असते. गावात कोण वरचढ, कुणाचा वट या सगळ्या बाबींना अधिक महत्व असतं. म्हणून ही निवडणुक जिंकण्यासाठी उमेदवार अगदी शर्तीचे प्रयत्न करत ही निवडणुक लढवतात आणि येणारे पुढील पाच वर्ष गावात सरपंच म्हणुन मिरवतात. पण  महाराष्ट्रात असं एक गाव आहे जिथे गेल्या २० वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळाचं नाही उडला. गेल्या २० वर्षांपासून हे गावं विना सरपंचाचं असुन या गावात प्रशासक राज्य आहे.

 

मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातील वसराम नाईक तांडा या गावाला गेल्या २० वर्षांपासून सरपंच नाही तर मागील १० वर्षांपासून ग्रामपंचायत सदस्य देखील नाही. या गावाची लोकसंख्या २ हजारांच्या जवळपास असावी. पण या संपूर्ण गावात फक्त बंजारा समाजाची लोक राहतात. इतर कुठल्याही जातीचे व समाजाचे या गावात एक ही घर नाही. मागील २० वर्षांपासून दर पंचवार्षिक निवडणुकीत या गावचे सरपंच पदाचे आरक्षण हे अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी सुटत आहे. त्यामुळे या गावाने मागील २० वर्षांपासून सरपंचच पाहिला नाही. तरी गावाला २० वर्षांपासून सरपंचचं नसल्याने या ग्रामपंचायतीचा विकास खुंटला आहे. (हे ही वाचा:-Maharashtra Gram Panchayat Election 2022: महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान, उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद, 20 डिसेंबरला मतमोजणी)

 

२० वर्षांपासून या गावावर प्रशासक राज आहे. या गावात फक्त बंजारा समाजाची लोक राहतात अशा गावच्या सरपंचपदाचे आरक्षण हे इतर जातीसाठी राखीव करणे हे चुकीचे आहे, असं मत वसराम नाईक तांडा या गावकऱ्यांनी मांडलं आहे. तरी या गावात बंजारा जातीसाठीचे आरक्षण आरक्षित करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. पण प्रशासनाने कुठल्याही प्रकारची कारवाई केली नसुन या गावाकडे दुर्लक्ष केल आहे. राज्यात आज सगळ्या ग्रामपंचायतीत निवडणुक होत असतांना पुन्हा एकदा पुढील पाच वर्षांसाठी हे गाव विना सरपंचाचं असणार आहे.