Mumbai Local Update: येत्या 1 जानेवारी 2021 पासून सर्वसामान्यांसाठी लोकल रेल्वे सेवा सुरु करण्याचे विजय वडेट्टीवार यांचे संकेत

येत्या 1 जानेवारी 2021 पासून मुंबई लोकल सेवा (Mumbai Local Service) सर्वसामान्यांसाठी नियमितपणे सुरु होईल असे संकेत मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिले आहेत. मध्यंतरी ट्विटरवर एका युजरने वि

Mumbai Local (Photo Credit - PTI)

संपूर्ण देशासाठी 2020 हे वर्ष त्यांच्या आयुष्यातील सर्वात वाईट स्वप्न होते. कोरोना व्हायरसमुळे देशात निर्माण भयाण परिस्थिती पाहता मार्चमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आले. त्यामुळे सर्व वाहतूक सेवा तात्काळ बंद करण्यात आल्या. यामुळे प्रवाशांचे देखील प्रचंड नुकसान झाले. तसेच मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी बंद केल्याने अनेक समस्यांना सामोरे लागले. अशा परिस्थितीत आता हे वर्ष लवकरच संपण्याच्या मार्गावर आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या 1 जानेवारी 2021 पासून मुंबई लोकल सेवा (Mumbai Local Service) सर्वसामान्यांसाठी नियमितपणे सुरु होईल असे संकेत मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिले आहेत.

मध्यंतरी ट्विटरवर एका युजरने विजय वडेट्टीवार यांना टॅग करत मुंबई लोकल सेवा कधी सुरु होतील याबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी लवकरच रेल्वे सेवा सुरु करू असे सांगितले होते. मात्र त्यानंतर परिस्थितीत काही विशेष बदल झालेला दिसला नाही. मात्र आता दिलेल्या नव्या माहितीनुसार, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी लोकल रेल्वे सर्वसामान्यांसाठी सुरु करणार असल्याचे संकेत विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.हेदेखील वाचा- Mumbai Local Will Be Started Soon: मुंबई लोकल सर्वांसाठी नियमितपणे लवकर सुरु होण्याची शक्यता, विजय वड्डेटीवारांनी दिले संकेत

दरम्यान मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी कोरोनाची स्थिती पाहून मुंबई लोकल सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेऊ अशी माहिती ABP माझाशी बोलताना दिली. सद्य स्थितीत महिलांसाठी लोकल सेवा ठराविक वेळेसाठी सुरु करण्यात आली आहे. त्या व्यतिरिक्त अत्यावश्यक सेवांमध्ये येणा-या कर्मचा-यांसाठी लोकल सेवा सुरु करण्यात आलेली आहे.

भारतामध्ये मागील 24 तासांत 22,065 नवे कोरोनाबाधित रूग्णांचे निदान झाले असून 354 जणांचा मृत्यू  झाल्याची माहिती समोर आली आहे. देशात सध्या 3,39,820 अ‍ॅक्टिव्ह रूग्ण   आहेत.