Vijay Diwas 2020 Celebrations: तारकर्लीच्या समुद्र किनारी 321 फूट लांबीचा भारत ध्वज फडवत साजरा झाला विजय दिवस
लोणंद येथील भैरवनाथ डोंगर ग्रुप मधील तरूणांनी ही अनोखी मानवंदना दिली आहे.
भारतामध्ये आज विजय दिवसाची (Vijay Diwas) 50 व्या वर्षपूर्तीचा उत्साह आहे. 1971 च्या भारत-पाक युद्धामध्ये 13 दिवसांत पाकिस्तानला नामोहरण करत पूर्व पाकिस्तानाला जाचातून मुक्त करून बांग्लादेश या राष्ट्राची निमिर्ती झाली. दरम्यान या दिवसाच्या औचित्याने अनेक माध्यमातून वीर जवानांच्या शौर्याला सलाम केला जात आहे. मात्र तारकर्लीच्या अथांग समुद्रामध्ये सुमारे 321 फूट लांबीचा तिरंगा फडकवत जवानांना मानवंदना देण्यात आली आहे. लोणंद येथील भैरवनाथ डोंगर ग्रुप मधील तरूणांनी ही अनोखी मानवंदना दिली आहे. Vijay Diwas 2020 Wishes: 1971 'विजय दिवसा'निमित्त Wallpapers, WhatsApp Status, Messages, HD Images च्या माध्यमातून Quotes शेअर करून करा जवानांना नमन.
आज सकाळी समुद्राच्या लाटांवर भारताचा ध्वज फडकवत त्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा दिल्या. या घोषणांनी सारा परिसर दुमदुमत होता. एव्हरेस्टवीर प्राजीत परदेशी आणि त्यांच्या 41 सदस्यांचा यामध्ये समावेश होता. समुद्रात 3 किमी आत जाऊन त्यांनी 321 फीट लांब आणि 10 फीट रूंद ध्वज फडकवला. Vijay Diwas 2020: 16 डिसेंबर 1971 रोजी भारताने मिळवला होता पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय, जाणून घ्या दिवसाचे महत्व आणि इतिहास.
विजय दिवस निमित्त तारकर्ली मध्ये सेलिब्रेशन
3 डिसेंबर 1971 दिवशी भारत सरकारने पाकिस्तान विरूद्ध युद्ध छेडले होते. त्यानंतर पाकिस्तान चे लष्कर जनरल अयुब खाब यांच्या अत्याचारातून पूर्व पाकिस्तानच्या लोकांची मुक्तता करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर पाकिस्तान विरूद्ध सुमारे 13 दिवस युद्ध सुरू होते. 16 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानी सेना कोणत्याही अटी शर्ती शिवाय आत्मसमर्पणासाठी पुढे आली आणि हे युद्ध संपलं. यंदा या भारत-पाकिस्तानच्या 71 सालच्या युद्धाची पन्नाशी आहे. त्यानिमित्त देशाचे पंतप्रधान 'Swarnim Vijay Mashaal'प्रज्वलित केले आहे.