वेंगुर्ला: माशांच्या जाळीत अडकलेल्या 95 किलो Green Sea Turtle ची मच्छिमारांकडुन सुटका, आदित्य ठाकरेंनी केलंं कौतुक (Watch Video)
वेंगुर्ला येथील समुद्रात मासे पकडण्यासाठी गेलेल्या काही मच्छिमारांंच्या जाळीत एक दुर्मिळ असं हिरव्या रंगाचं कासव (Green Sea Turtle) पकडलं गेलं होतं.
प्राणी आणि जीवसृष्टीच्या बाबत मानवाकडुन नेहमीच अन्याय होत असल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या, ऐकल्या आहेत, मात्र अलिकडेच वेंगुर्ला (Vengurla) येथे घडलेल्या एका घटनेत अजुनही माणुसकी शिल्ल्क आहे याची प्रचिती येते. वेंगुर्ला येथील समुद्रात मासे पकडण्यासाठी गेलेल्या काही मच्छिमारांंच्या जाळीत एक दुर्मिळ असं हिरव्या रंगाचं कासव (Green Sea Turtle) पकडलं गेलं होतं. मासे पकडायच्या जाळीत या कासवाचं अंग अडकल्याने त्याला बाहेर पडता आलं नाही आणि तब्बल 95 किलोचं हे कासव मच्छिमारांंच्या हाती लागलं.यावेळी कासव इतक्या विचित्र पद्धतीने अडकलं होतं की त्याला सहज बाहेर काढणंं शक्यच नव्हतं आणि त्या अडकलेल्या परिस्थितीत त्याची वाईट अवस्था होत होती, अशावेळी या मच्छिमारांंनी आपली मासे पकडायची जाळी फाडुन त्याची सुटका केल्याचे समजत आहे. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत असुन मच्छिमारांंच्या या कामाचे स्वतः पर्यटन आणि पर्यावरण मंंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांंनी सुद्धा कौतुक केले आहे.
रणजीत जाधव या ट्विटर युजर ने हा व्हिडिओ शेअर करत असे कासव हाती लागल्याची माहिती दिली आहे. या खाली दिलेल्या व्हिडिओत सुद्धा तुम्ही पाहु शकता की सुरुवातीचा बराच वेळ हे कासव हलुही शकत नव्हते आणि जशी त्याची सुटका होते ते अक्षरशः तडफडु लागते. हे तब्बल 95 किलो वजनाचे महाकाय स्वरुपातील कासव आहे त्यामुळे त्याला सहजासहजी पलटणे किंंवा हालचाल करणे शक्य होत नाहीये मात्र त्यातही हे मच्छिमार त्याची मदत करत आहेत.
95 किलोचे Green Sea Turtle
दरम्यान कासवांंची Green Sea Turtle ही प्रजाती समुद्री जीवसृष्टीसाठी बरीच फायदेशीर आहे, समुद्री गवत जे की मासे व अन्य जलचरांंसाठी खाद्य असते त्याच्या वाढीला या कासवांंच्या अंड्यांंमुळे बरीच मदत होते. साधारणतः हे जीव अटलांंटिक व पॅसिफिक समुद्रात आढळतात, भारतीय समुद्रातही त्यांंचे वास्तव्य आढळुन आले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)