Atal Setu Viral Video: पूर्वसूचना देऊनही अटल सेतूवर वाहनधारकांकडून वाहने थांबवणे सुरूच; मुंबई पोलिसांकडून तक्रारीची दखल, पहा व्हिडिओ

X (पूर्वीचे ट्विटर) वर एका वापरकर्त्याने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये सागरी पुलाच्या बाजूला थांबलेल्या वाहनांची लांबलचक रांग दिसत आहे. तसेच प्रवासी गाड्यांमधून बाहेर उभे राहून वाऱ्याचा आनंद घेत आहेत. दुसऱ्या व्हिडिओमध्ये, दोन व्यक्ती हाय-स्पीड कारमध्ये कारच्या रुफवर बसलेले दिसत आहेत. विशेष म्हणजे, दोन्ही व्हिडिओंमध्ये, वाहनांना भगवे झेंडे लावलेले दिसत आहेत.

Atal Setu Viral Video (PC -X/@IdiotsRoads)

Atal Setu Viral Video: नव्याने बांधलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक ब्रिजवर (Mumbai Trans Harbour Link) (अटल सेतू) अनेक वाहने धोकादायकपणे थांबत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. X (पूर्वीचे ट्विटर) वर एका वापरकर्त्याने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये सागरी पुलाच्या बाजूला थांबलेल्या वाहनांची लांबलचक रांग दिसत आहे. तसेच प्रवासी गाड्यांमधून बाहेर उभे राहून वाऱ्याचा आनंद घेत आहेत. दुसऱ्या व्हिडिओमध्ये, दोन व्यक्ती हाय-स्पीड कारमध्ये कारच्या रुफवर बसलेले दिसत आहेत. विशेष म्हणजे, दोन्ही व्हिडिओंमध्ये, वाहनांना भगवे झेंडे लावलेले दिसत आहेत.

व्हायरल व्हिडिओवर नवी मुंबई पोलिसांची प्रतिक्रिया -

नवी मुंबई पोलिसांनी व्हायरल झालेल्या या पोस्टला उत्तर दिले आहे. व्हिडिओची दखल घेत विभागाने हा मुद्दा संबंधित वाहतूक शाखेकडे पाठवला आहे. 'नवी मुंबई पोलिसांशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद, तुमची तक्रार संबंधित वाहतूक शाखेकडे पाठवण्यात आली आहे,' असं ट्विट नवी मुंबई पोलिस विभागाने केलं आहे. (हेही वाचा - Atal Setu Become a Selfie Point: मुंबईमधील न्हावा-शेवा अटल सेतू बनला सेल्फी पॉइंट; दोन दिवसांत शेकडो वाहनचालकांना ठोठावला दंड (Watch))

पहा व्हिडिओ -

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड -

15 जानेवारीपर्यंत अटल सेतूवर थांबणाऱ्या 130 हून अधिक वाहनचालकांना चलन जारी करण्यात आले होते. 'नो स्टॉपिंग' असे फलक उभारूनही वाहनचालक नियमांची पायमल्ली करत सेल्फी आणि ग्रुप पिक्चर्स घेण्यासाठी आपली वाहने अटल सेतूवर उभी करत आहेत. (Mumbai Atal Setu: 'लोकांच्या सोयीसाठी बांधलेल्या 'अटल सेतू’वर थांबून फोटो काढणे बेकायदेशीर'; Mumbai Traffic Police यांनी केले नागरिकांना आवाहन)

भारतातील सर्वात लांब पुल अटल सेतू -

17,840 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधलेला, अटल सेतू हा 21.8-किलोमीटर लांबीचा, 6 लेनचा पूल आहे. ज्याची लांबी समुद्रावर सुमारे 16.5 किमी आहे. तसेच हा देशातील सर्वात लांब सागरी पूल आहे. हा पूल मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जलद कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करेल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now