Prakash Ambedkar On Pegasus: भाजपकडचे मुद्देच संपलेत, पेगसास प्रकरणातही तोंडावर पडला- प्रकाश आंबेडकर
पेगाससच्या मुद्द्यावरुन भाजप (BJP) तोंडघशी पडले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi ) संस्थापक प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी भारतीय जनता पक्षावर पेगासस (Pegasus) आणि टिपू सुलतान या मुद्द्यांवरुन जोरदार टीकास्त्र सोडले आहे. पेगाससच्या मुद्द्यावरुन भाजप (BJP) तोंडघशी पडले आहे. नूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2017 मध्येच पेगासस विकत घेतले आहे. मात्र, या प्रकरणावरुन लक्ष इतरत्र वळविण्यासाठी टीपू सूलतान आणि इतर विषय उकरुन काढले जात आहे. मात्र, या मुद्द्यांवरुन भाजप कधीच तोंडावर पडले आहे, असे टीकास्त्र प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सोडले आहे.
भाजपकडचे मुद्देच आता संपले आहेत. त्यामुळे ते इतरत्र मुद्दे शोधत फिरत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने खरे तर पेगासस का खरेदी केले असे विचारायला हवे होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने तसा प्रश्न विचारला नाही. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत एक कमीशन नेमले आहे. पण हे कमीशनही आता काहीच उत्तर देत नाही, असे म्हणत आंबेडकर यांनी टीकास्त्र सोडले आहे. (हेही वाचा, Prakash Ambedkar On BJP: सत्तेत येण्यासाठी हिंदू-मुस्लिम वाद भडकवण्याचा भाजपचा प्रयत्न, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांची घणाघाती टीका)
भाजपने उपस्थित केलेला मुद्दा हा केवळ मुस्लिम विरोधातून पुढे आला आहे. भाजपकडे केवळ मुस्लिम द्वेश हा एकमेव मुद्दा आहे. हाच त्यांचा अजेंडा आहे आणि तो त्यांनी वापरायलाही सुरुवात केली आहे. हा मुद्दा फार काही चालेल असे मला अजिबात वाटत नाही. टीपू सुलतान हा आपले स्वत:चे राज्य वाचवता वाचवता शहीद झाला. हा इतिहास लोकांच्या समोर आहे. तो ब्रिटीशांच्या विरोधात लढत होता. मुंबईमध्ये मालाड येथे गार्डनला टिपू सुलतान याचे नाव देण्याच्या वादावर गदारोळ सुरु आहे
आता टिपू सुलतानचा मुद्दा आलेला आहे तो अँटी मुस्लिम दृष्टिकोनातून आलेला आहे. भाजपकडे अँटी मुस्लिम शिवाय दुसरा अजेंडा नाही आणि त्यांनी त्याला सुरुवात केलेली आहे. तेव्हा हा मुद्दा फार चालेल मला असं वाटत नाही. टिपू सुलतान आपले राज्य वाचवता वाचवता शहीद झाला अशी परिस्थिती आहे.हा इतिहास लोकांच्या समोर आहे. त्यामुळे टिपू सुलतान ब्रिटिशांच्या विरोधात लढत होता एवढेच सिद्ध झालं आहे. हाच इतिहास आहे,असे लोक मानतात. मुंबईतल्या मालाड येथील गार्डनला टिपू सुलतान याचे नाव देण्याच्या वादावर झालेल्या गदारोळावर स्वत: भाजप तोंडघाशी पडलेलं असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.