Vasai murder scandal: वसई हादरली! बेपत्ता अल्पवयीन मुलीचा बंद खोलीत कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, १४ वर्षाच्या मुलाला वडिलांसह अटक

मुलगी चिडवते म्हणून तिच्या घराशेजारी राहणाऱ्या एका १४ वर्षीय मुलाने खून केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Crime (PC- File Image)

Vasai murder scandal: मुंबईतील वसईत एका 8 (8 Year Old Girl) वर्षीय मुलीचा मृतदेह (Deathbody) तिच्या घरा शेजारील एक बंद खोलीत कुजलेल्या आणि हातपाय बांधलेल्या अवस्थेत प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळलेल्या अवस्थेत सापडला आहे. धक्कादायक म्हणजे ही मुलगी दोन दिवसांपासून बेपत्ता (Missing) होती. त्यानंतर तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांनी मुलीच्या हत्ते प्रकरणी काही तासांतच छडा लावला आहे. मुलगी चिडवते म्हणून तिच्या घराशेजारी राहणाऱ्या एका 14 वर्षीय मुलाने खून केला असल्याची माहिती समोर आली आहे. मुलीचा मृतदेह पोलिसांनी (Police) ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. (हेही वाचा- गुदाशयात एअर कँप्रेसर घातल्याने एकाचा मृत्यू, पुणे येथील हडपसर औद्यगिक वसाहतीतील घटना)

मुलगी बेपत्ता, पालक चिंतेत

मिळालेल्या माहितीनुसार, मुलीचा खून कौटुंबिक वादातून केल्याचे निष्पण झाले असून आरोपी मुलाला वाचवण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी मुलाच्या वडिलांना देखील अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या तपासणीत मुलीवर लैंगिक अत्याचार झाला आहे का? याची शवविच्छेदन रिपोर्ट आल्यावर माहिती समजणार आहे. चांदणी शाहा असं नाव असलेली मुलगी वसई येथील वान्याचा पाडा येथील घरातून बेपत्ता झाली होती. शनिवारी शाळेतून घरी आल्यानंतर तीनं वडिलांकडून आईस्क्रीम घेण्यासाठी पैसे घेऊन बाहेर दुकानात गेली. त्यानंतर ती अचानक बेपत्ता झाली. बराच वेळ घरी परतली नसल्याने पालकांनी तीची परिसरात शोधाशोध घेतली. परिसरात ती कुठंच सापडली नसल्याने चिंतीत पालकांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली.  पेल्हार पोलिसांनी तात्काळ बेपत्ता मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली.

बंद खोलीत सापडला मृतदेह

पोलिसांनी परिसरात शोध घेतल्यानंतर अखेर मुलीचा मृतदेह सापडला. एका बंद खोलीत हात पाय बांधलेल्या अवस्थेत एका प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळलेला तिचा मृतदेह सापडला. या प्रकरणी पोलिसांनी परिसरात गांभीर्याने चौकशी सुरु केली. त्यावेळी शेजारचा 14 वर्षाचा मुलगा दोन दिवसांपुर्वी गावी गेल्याची माहिती पोलिसांना समजली. पोलिसांनी मुलाच्या आई वडिलांना ताब्यात घेतले त्यानी या संदर्भात त्यांनी पोलिसांची टाळाटाळ करत उत्तरे दिली. पोलिसांचा दणका दाखवत अखेर दोघांनी या घटनेची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला जालन्यातून पकडण्यासाठी पथक नेमलं. त्यानंतर गुन्हा दाखल करून आरोपी मुलासह वडिलांना देखील पोलिस कोठडीत ठेवले आहे.