पुणे येथील हडपसर औद्योगिक वसाहतीमध्ये(Hadapsar Industrial Estate, Pune) धक्कादायक प्रँक दरम्यान झालेल्या अंतर्गत दुखापतीमुळे एका किशोरवयीन मुलाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलगा 16 वर्षांचा असून मोतीलाल बाबूलाल साहू असे त्याचे नाव आहे. गुदद्वारात कंप्रेसरची नळी (Air compressor in rectum घातल्याने आतडे फाटून त्याचा मृत्यू झाला. त्याचा दूरचा नातेवाईक, 21 वर्षीय धीरजसिंग गोपालसिंग गौड याने बुधवारी खेळ म्हणून कंप्रेसरची नळी मोतीलाल यांच्या गुदद्वारात घातली. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. ही घटना हडसपसर येथील एका फूड प्रोसेसींग केंद्रातील तिसऱ्या मजल्यावर घडली.
आरोपी पोलिसांच्या ताब्यात
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई केली. त्यांनी 21 वर्षीय आरोपी धीरजसिंग गोपालसिंग गौड याला ताब्यात घेतले आहे. मोतीलालचे काका, शंकर साहू हे ही घटना ज्या फूड प्रोसेसिंग केंद्रात घडली त्याच युनिटमध्ये नोकरी करतात आणि व्यवसायाच्या कारणास्तव तिथेच राहतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुनच गुन्हा दाखल होऊन आरोपीला अटक करण्यात आली आहे. (हेही वाचा, बायकोने अपहरण करुन नवऱ्याच्या प्रेयसीच्या गुप्तांगात भरली चटणी, बनवला VIDEO)
गुदद्वारात हवेचा स्फोट
हडपसरचे पोलीस अधिकारी रवींद्र शेळके यांनी पुष्टी केल्यानुसार, गुदाशयात हवेचा अचानक स्फोट झाल्यामुळे अंतर्गत जखमा होऊन पीडिताचा मृत्यू झाला. या धक्कादायक प्रकारानंतर प्राप्त तक्रारीवरुन पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 304-A अंतर्गत कायदेशीर कारवाईकेली. आरोपीवर निष्काळजी वर्तनामुळे दुसर्या व्यक्तीचा मृत्यू घडवून आणल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. (हेही वाचा, Vile Parle: धक्कादायक! विलेपार्ले येथे वयोवृद्ध सासूची हत्या, गुप्तांगात टाकला बांबू; जावायाला अटक)
आरोपी आणि पीडित एकाच गावचे
गौड आणि मोतीलाल हे दोघेही मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यातील मणिपूर गावचे रहिवासी होते. मोतीलाल अलीकडेच आपल्या काकांसोबत पुण्यात राहायला गेले होते. फूड प्रोसेसिंग युनीटमध्ये ते औपचारीकपणे कामाला नव्हते. मात्र, त्यांचा वावर तेथे असे. आरोपीने दोन महिन्यांपासून गौडशी मैत्री केली. त्यातून पुढे त्याच्याशी जीवघेणे वर्तन केले, असे पोलिसांच्या निवेदनात म्हटले आहे.
एक्स पोस्ट
Maharashtra | Two people died and five others injured in Sakawar on Mumbai-Ahmedabad Highway last evening. The incident occurred when the tire of a car burst, the vehicle overturned after losing balance and a motorcycle coming from behind rammed into it.
— ANI (@ANI) December 7, 2023
केवळ खेळण्याच्या उद्देशाने गुदद्वारात हवा भरणे, ड्रील मशीन फिरवणे किंवा तत्सम प्रकार केल्याच्या घटना या आधीही घडल्या आहेत. ज्याचा परिणाम पीडिताचा मृत्यू होण्यात झाला आहे. अशा या धक्कादायक प्रकारामुळे आजवर अनेकांचे प्राण गेले आहेत. त्यामुळे पालकांनीही आपली मुले काय खेळतात, त्याचे स्वरुप काय आहे. याबाबत दक्ष असायला हवे, असे अवाहन सामाजिक कार्यकर्ते करतात. अशा प्रकरणात पोलिसांकडूनही कडक कारवाई केली जाते.