Vile Parle: धक्कादायक! विलेपार्ले येथे वयोवृद्ध सासूची हत्या, गुप्तांगात टाकला बांबू; जावायाला अटक
Crime Scene | Representational Image | (Photo Credits: PTI)

मुंबईतील (Mumbai) साकीनाका (Sakinaka) परिसरात एका महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात लोखंडी रॉड घुसवल्याचा अमानुष प्रकार घडला. त्यानंतर उपाचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. या घटनेला आठवडा उलटला नाही, तोच विलेपार्ले (Vile Parle) येथून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. विलेपार्ले येथे सासूची हत्या (Man Kills Mother-In-Law) करून तिच्या गुप्तांगात बांबू टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जावायाला अटक करण्यात आली असून त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कुख्यांत गुंड असून त्याच्याविरुद्ध 28 हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. यापैकी 8 गुन्ह्यात त्याला शिक्षा झाली आहे. सासूची हत्या करण्यापूर्वी दोन दिवस अगोदर आरोपीची तरुंगातून सुटका झाली होती. मृत महिलेची मुलगी आरोपीची पत्नी आहे. परंतु, आरोपी तरूंगात असताना त्याच्या पत्नीने अन्य दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न करून तेथून निघून गेली होती. ती कुठे आहे? याची माहिती आरोपीच्या सासूला होती. मात्र, वारंवार विचारणा करुनही तिने तिचा पत्ता सांगितला नाही. यामुळे त्यांच्यात वाद निर्माण झाला. याच वादातून आरोपीने सासूची हत्या केली आणि तिच्या गुप्तांगात बांबू टाकल्याची माहिती समोर येत आहे. हे देखील वाचा- Sakinaka Rape and Murder Case: राज्य सरकार कडून पीडीतेच्या कुटूंबाला 20 लाखांची मदत

एएनआयचे ट्वीट-

मुंबई गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मुंबईत जानेवारी ते जुलै महिन्याच्या कालावधीत बलात्काराच्या 550 घटना घडल्या आहेत. तर, तब्बल 1100 विनयभंगांचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.