वसई: बंदोबस्ताला असणाऱ्या 18 पोलिसांना कोरोनाची लागण
कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या पोलिसांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाणार आहे.
गणेशचतुर्थी उत्सव आणि मोहरमसाठी बंदोबस्तासाठी असलेल्या वसईतील 18 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या पोलिसांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाणार आहे. पोलिसांची अँन्टीजेन टेस्ट केल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. सणानिमित्त पालघर जिल्ह्यात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाची चाचणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचसोबत संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अँन्टीजेन चाचणी करावी अशा सुचना सुद्धा दिल्या आहेत.
पालघर मधील जिल्हाधिकारी पोलिसांच्या मुख्यालयाने असे म्हटले आहे की, पोलिसांची अँन्टीजेन चाचणी केल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्यांना आता रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाणार आहे. ज्या पोलीस कर्मचाऱ्यांची अँन्टीजेन चाचणी निगेटिव्ह येईल त्यांना तातडीने RC-PTR चाचणी करावी लागणार आहे.(Coronavirus in Maharashtra Police: महाराष्ट्र पोलिस दलात 15,591 कोरोना बाधित; एकूण 158 पोलिसांचा मृत्यू)
दरम्यान, जिल्ह्यातील आतापर्यंत चार पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. त्यापैकी तीन जण हे वाळीव पोलीस स्थानक आणि एक कर्मचारी नालासोपारातील (पूर्व) तुलिंग पोलीस स्थानकातील होता. जवळजवळ 314 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 18 जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर 48 जणांवर उपचार सुरु आहेत. तर जिल्ह्यात मंगळवार पर्यंत कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 24,725 वर पोहचला आहे. त्यापैकी 16,753 वसई-विरार येथील रुग्ण आहेत. तब्बल 1.41 लाख स्बॅब टेस्ट करण्यात आल्या असून 1 लाख या वसई-विरार मधील आहेत. त्याचसोबत 511 जणांचा जिल्ह्यात कोरोनामुळे मृ्त्यू झाला आहे.