Vande Sadharan Express: 'वंदे साधरण एक्स्प्रेस' मुंबईत दाखल; माझगाव येथील वाडीबंदर रेल्वे यार्डात घेण्यात येणार ट्रायल

चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) द्वारे 65 कोटी रुपये खर्चून ही ट्रेन तयार करण्यात आली आहे. तिच्या दोन्ही टोकांना इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हसह 22 डबे आहेत. यामध्ये 12 स्लीपर क्लास कोच, आठ जनरल डबे आणि दोन गार्ड कोच यांचा समावेश आहे

Vande Sadharan Express (PC - Twitter)

Vande Sadharan Express: पहिली वंदे साधरण एक्स्प्रेस (Vande Sadharan Express) रविवारी सकाळी मुंबईत (Mumbai) दाखल झाली. ती माझगाव येथील वाडीबंदर रेल्वे यार्ड (Wadibandar Railway Yard) मध्ये चाचणीसाठी ठेवण्यात आली आहे. मुंबई-नाशिक मार्गावरील थळ घाटावरील इगतपुरीच्या उंच डोंगरावरही ही ट्रेन धावणार आहे. ही रेल्वे मुंबईपासून WR मार्गांवर प्रवासी सेवेत धावणार आहे.

वंदे साधरण एक्स्प्रेस चे नाव अद्याप औपचारिक ठरले नसले तरी, ही ट्रेन वंदे भारत एक्सप्रेसचे प्रतिबिंब आहे. ही सेवा आरामदायी आणि आधुनिक डिझाईन पण सर्वसामान्यांना परवडणाऱ्या कमी भाड्यात चालवण्यात येत आहे. (हेही वाचा - Andhra Pradesh Train Accident: आंध्र प्रदेश रेल्वे अपघात, मृतांची संख्या डझनाहून अधिक, 13 पैकी 7 जणांची ओळख पटली, घ्या अधिक जाणून (Watch Videos))

चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) द्वारे 65 कोटी रुपये खर्चून ही ट्रेन तयार करण्यात आली आहे. तिच्या दोन्ही टोकांना इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हसह 22 डबे आहेत. यामध्ये 12 स्लीपर क्लास कोच, आठ जनरल डबे आणि दोन गार्ड कोच यांचा समावेश आहे.

दोन्ही टोकांना लोकोमोटिव्ह असलेली पुश-पुल व्यवस्था, जलद प्रवेग आणि अधिक अखंड प्रवास अनुभव सुनिश्चित करते. ट्रेनमध्ये अंदाजे 1,800 प्रवासी बसू शकतात. ट्रेनचा जास्तीत जास्त ताशी वेग 130 किमी आहे. वाडीबंदर येथे, अधिकाऱ्यांनी ट्रेनच्या स्थिर चाचण्या घेतल्या. ज्यामध्ये मोटर कोच आणि इतर डबे यांच्यातील समन्वयाची चाचणी घेण्यात आली.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

संबंधित बातम्या

Pushpak Express Accident: परांडा रेल्वे स्टेशन जवळ पुष्पक एक्सप्रेस च्या प्रवाशांचा गंभीर अपघात; ट्रेनमध्ये आग लागल्याच्या अफवेतून बाहेर आलेल्या प्रवाशांना कर्नाटक एक्सप्रेसने उडवलं

Rajathan: मुलीच्या लग्नासाठी नाकारली रजा; मानसिक तणावाखाली रेल्वे कर्मचाऱ्याने ऑफिसमध्ये केली आत्महत्या, तपास सुरु

Mumbai Western Railway Block: दुरुस्तीच्या कामासाठी पश्चिम रेल्वेने जाहीर केला 24 ते 26 जानेवारी दरम्यान मोठा ब्लॉक; अनेक सेवा रद्द, तर काही अंशतः प्रभावित, जाणून घ्या सविस्तर

Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेने माहीम ते वांद्रे दरम्यान पूल पुनर्बांधणीसाठी 24 ते 26 जानेवारीदरम्यान मेगा ब्लॉक, जाणुन घ्या सविस्तर माहिती

Share Now