Us Parishad 2020: स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस परिषदेत राजू शेट्टी काय बोलणार? शेतकऱ्यांसह, साखर कारखानदार, राजकीय वर्तुळात उत्सुकता
कोल्हापूर जिल्ह्यातील आणि इतरही कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याची संमती दर्शवली. परंतू, कारखान्यांनी एफआरपी रक्कम 14% अधिक द्यावी यावर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम आहे.
Sugarcane Conference 2020: माजी खासदार आणि शेतकरी नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना आयोजित ऊस परिषद (Swabhimani Shetkari Sanghatana) आज (2 ऑक्टोबर) पार पडत आहे. या वेळी पहिल्यांदाच ही ऊस परिषद ( Sugarcane Conference 2020) ऑनलाईन पद्धतीने पार पडत आहे. या ऊस परिषदेत राजू शेट्टी दुपारी 2 वाजता काय बोलणार याकडे ऊस उत्पादक आणि साखर कारखान्यांसह राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आणि इतरही कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याची संमती दर्शवली. परंतू, कारखान्यांनी एफआरपी रक्कम 14% अधिक द्यावी यावर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम आहे. तसेच संघटनेचा आंदोलनाचा पवित्राही कायम आहे. या पर्श्भूमीवर राजू शेट्टी यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यावर असलेले कोरोना व्हायरस संकट पाहता मोठे मेळावे, समारंभ, कार्यक्रम आयोजित करण्यात बंदी आहे. त्यामुळे या बंदी आणि नियमांचे पालन करत शिवसेना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. त्यासोबत दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर होणारे इतरही काही पारंपरीक कार्यक्रम अत्यंत साधेपणाने पार पडले आहेत. त्याचप्रमाणे यंदा ऊसपरिषदही ऑनालाईन पार पडत आहे.
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्यात एक बैठक सरकारी विश्रामगृहात शनिवारी पार पडली. या बैठकीत यंदाच्या गळीत हंगामात साखर कारखाने ऊस उत्पादकांना एकरकमी एफआरपी देणार असे सांगण्यात आले. शेतकरी संघटनेने या वेळी काहीशी वेगळी भूमिका मांडली. शेतकरी संघटनेने म्हटले की, ऊसतोड मजूरांच्या मजुरीमध्ये जी 14% वाढ करण्यात आली आहे ती वाढीव रक्कम शेतकऱ्यांच्याच एफआरपीमधून देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या वेळी 14% इतका वाढीव एफआरपी मिळावा असे स्वाभिमानीने म्हटले आहे. तसेच, स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यावर ठामही आहे. (हेही वाचा, Maharashtra MLC Election 2020: राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी महाविकासआघाडी सरकार आज शिफारस करण्याची शक्यता, राजू शेट्टी यांची लागणार वर्णी?)
दरम्यान, या बैठकीनंतर कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आवाडे यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पाटील म्हणाले, यंदा साखर कारखानेही अडचणीत आहेत. आपण त्यांची अडचण समजून घेतली पाहिजे. साखरेचे भाव घसरले आहेत. शिल्लख असलेली साखरही मोठ्या प्रमाणावर पडून आहे. अशा वेळी सर्वांनीच समजून घेतक तोडगा काढायला हवा, असेही सतेज पाटील या वेळी म्हणाले.