मुंबई मध्ये तापासोबत अंगभर पुरळ पण डेंग्यू, चिकनगुनियाच्या टेस्ट मध्ये निगेटिव्ह, जाणून घ्या तज्ञांचे मते काय हे आजारपण
नीलम अंधारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या या नेमकं निदान होऊ न शकलेल्या तापामध्ये रूग्णाच्या अंगावर गुलाबीसर रंगाचे स्पॉट दिसत आहेत. ते 2 दिवसामध्ये जातात. तापाच्या चौथ्या पाचव्या दिवशी ते दिसतात.
मुंबई (Mumbai) मध्ये आता तापासोबत (Fever) अंगभर रॅश (Body Rash) येण्याच्या लक्षणांनी अनेकजण हैराण झाले आहेत. हा ताप 4-5 दिवस राहतो. तर तापमान 99 ते 102 मध्ये नोंदवलं जातं. यामध्ये रूग्णाच्या शरीरावर चौथ्या, पाचव्या दिवशी रॅश दिसतात. यासोबत डोळे जड वाटणं, सतत जाणवणारी डोकेदुखी, कमजोर वाटणं, झोप येणं ही लक्षणं दिसतात. पण ही लक्षणं दिसूनही रूग्ण डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया किंवा इतर रोजच्या इंफेक्शन मध्ये निगेटिव्ह दाखवला जातो.
तापासोबत रॅश उठणं हे डेंग्यू मध्ये दिसतं पण यामध्ये डेंग्यू ची टेस्ट केल्यास तो रिपोर्ट निगेटिव्ह दाखवला जातो. त्यामुळे डॉक्टरही उपचार करताना बुचकळ्यात पडले आहेत. BYL Nair Hospital च्या फिजिशियन कडून अशाप्रकरचा ताप मागील 2 महिन्यांपासून मुंबई मध्ये असल्याची माहिती TOI शी बोलताना दिली आहे.
बीएमसीच्या प्रमुख हॉस्पिटलच्या संचालक, डॉ. नीलम अंधारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या या नेमकं निदान होऊ न शकलेल्या तापामध्ये रूग्णाच्या अंगावर गुलाबीसर रंगाचे स्पॉट दिसत आहेत. ते 2 दिवसामध्ये जातात. तापाच्या चौथ्या पाचव्या दिवशी ते दिसतात. काही जणांमध्ये सांध्याचे दुखणेही जाणवत असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. अंगावर उठणार्या या पुरळला खाज देखील येते. अद्याप या रूग्णांमध्ये सुदैवाने कोणतीही जीवघेणी गुंतागुंत दिसत नाही.
रूग्नांचे मेडिकल रिपोर्ट्स पाहता त्यामध्ये पांढर्या रक्तपेशी कमी झालेल्या दिसतात. लाल रक्तपेशी वाढलेल्या आहेत. ESR,CRP मधील वाढ ही inflammatory markers असल्याचं दाखवतात असे डॉक्टर म्हणाले आहेत. physician Dr Pratit Samdani यांनी यावर बोलताना रूग्णांमध्ये पीसीआर टेस्ट पुन्हा करण्याचा सल्ल्ला देत असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.
संसर्गजन्य आजाराचे एक्सपर्ट वसंत नागवेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, Dengue 2 आणि Dengue 4 serotypes, यांची यावेळी वाढ झाली आहे. त्यामुळे सुरूवातीला डेंग्यू, चिकनगुनियाचे रिपोर्ट्स निगेटिव्ह दिसत आहेत. निदानासाठी molecular tests वरूनच अंदाज येऊ शकतो.